Shocking Viral Video : मोबाईल आता प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत प्रत्येकाच्या फक्त हातात मोबाईल दिसतो. त्यामुळे मोबाईल हे हल्ली एक प्रकारचं व्यसन बनलं आहे. याच मोबाईलमुळे हल्लीच्या मुलांमधील निरागसपणा हरवत चालला आहे. या मुलांना रात्रंदिवस मोबाईलशिवाय दुसरं काही दिसत नाही. ही मुलं हल्ली खेळणं-बागडणं विसरत चालली आहेत. काही वेळा तर ती मोबाईलसाठी इतका धिंगाणा घालतात की, विचारता सोय नाही, तर कधी ही मुलं मोबाईल घेतल्यावर इतकी हिंसकपणे वागतात की, ते पाहून पालकांनाच त्यांची भीती वाटू लागते. अशाच प्रकारची एक भयंकर घटना समोर आली आहे. या घटनेत एक लहान मुलगा चक्क मोबाईलसाठी आपल्या आईच्या जीवावर उठल्याचे स्पष्ट झाले.

व्हिडीओमध्ये एक मुलगा आईने हातातून मोबाईल हिसकावल्याने चिडला आणि त्यानंतर रागाच्या भरात त्याने आईच्या डोक्यात लाकडी बॅट घातली. यावरून लहान मुलांचे मोबाईलचे व्यसन पालकांसाठी किती घातक ठरू शकते हे दिसून येते.

हेही वाचा – बाई sss हा काय प्रकार! बसमध्ये मोठ्याने गाणी ऐकणाऱ्या तरुणावर भुंकू लागली तरुणी; video पाहून युजर्स म्हणाले…

आईने हातातून मोबाईल हिसकावताच लहान मुलगा संपातला अन्….

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, शाळेच्या गणवेशातील एक लहान मुलगा बेडवर बसून मोबाईल खेळत असल्याचे दिसत आहे. जवळच टीव्ही चालू आहे; पण मुलगा मोबाईलवर गेम खेळण्यात व्यग्र आहे. त्याने शाळेचा गणवेशही बदललेला नाही. तेवढ्यात त्याची आई बाहेर येते आणि त्याच्याकडून मोबाईल हिसकावून घेते. यावेळी ती तिच्या कानशिलात लगावते आणि अभ्यासाला बस, असे सांगते.

मोबाईल हिसकावून घेतल्यानंतर आई जेवणाचे ताट घेऊन बसते आणि टीव्ही पाहू लागते. त्यानंतर तो लहान मुलगा काही वेळ तसाच बेडवर बसून राहतो आणि आपल्या आईकडे रागाने पाहू लागतो. त्यानंतर तो उठून किचनमध्ये जातो आणि नंतर रागात बाहेर येऊन, तिथे ठेवलेली बॅट जेवायला बसलेल्या आईच्या डोक्यात मारतो. यावेळी आई बेशुद्ध होऊन जमिनीवर कोसळते.

पण, कसलीही भीती किंवा आपण काही चुकलोय हे मनात न आणता, तो मुलगा चक्क बेशुद्ध पडलेल्या आईच्या हातून मोबाईल घेतो आणि पुन्हा गेम खेळायला सुरुवात करतो. ही सर्व थरारक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

संतापलेल्या चिमुकल्याने आईच्या डोक्यात घातली क्रिकेट बॅट

आता या व्हिडीओबाबत विविध प्रकारचे दावे केले जात आहेत. काही लोक या व्हिडीओला जुना म्हणत आहेत. काही लोकांनी हा व्हिडीओ रीपोस्ट करीत याला खऱ्या आयुष्यातील घटना म्हटले आहे. काही लोकांनी हा स्क्रिप्टेड व्हिडीओ असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. यामागे लोकांनी अनेक कारणेही दिली आहेत.