Shocking Viral Video : लहान मुलं कधी काय करतील याचा काही नेम नाही, त्यामुळे पालकांना सतत त्यांच्या प्रत्येक हालचालीकडे लक्ष ठेवून राहावे लागते. कारण घरात असताना ते काही वेळा असे काही उपद्रव करून ठेवतात की पालकांना निस्तारणंपण कठीण होऊ जातं. अशाप्रकारे एका चिमुकल्याने मृत आजोबांच्या कलशात ठेवलेल्या अस्थींबरोबर असं काही केलं की पाहून तुम्हालाही धक्का बसेल. या घटनेचा एक व्हिडीओ चिमुकल्याच्या आईनेच सोशल मीडियावर पोस्ट केला आहे, जो आता तुफान व्हायरल होतोय.
चिमुकल्याचे कृत्य पाहून आई झाली शॉक (Child Eats Grandfather Ashes)
खरं तर व्हिडीओत दिसणारा चिमुकला वयाने फारचं लहान आहे, त्यामुळे तो काय करून बसला याचीही त्याला जाणीव नाही. पण, आईने जेव्हा ते पाहिलं तेव्हा ती शॉक झाली. या चिमुकल्याने चक्क दिवगंत आजोबांची कलशात ठेवलेली राख सांडवली, त्यानंतर ती खाल्ली, हे पाहून त्याची आईदेखील घाबरली. ही घटना ब्रिटनमधील आहे.
चिमुकल्याची आई नताशा आमिनी यांनी याबाबत एक पोस्ट केली आहे, ज्यात तिने म्हटले की, तिच्या दिवंगत वडिलांच्या अस्थीचा कलश तिने घरातील लिव्हिंग रुममधील एका टेबलवर ठेवला होता. पण, जेव्हा ती काही वेळ कपडे ठेवण्यासाठी गेली, तेव्हा परत आल्यावर तिने हे दृश्य पाहिलं आणि ती थक्क झाली.
तिच्या एक वर्षाच्या कोआह नावाच्या चिमुकल्याने चक्क अंगावर कलशातील राख (अस्थी) फासली होती. तसेच तो नंतर ती राख खोलीभर पसरवत होता. तिने हे दृश्य पाहताच व्हिडीओ शूट केला, ज्यात ती असं म्हणताना ऐकू येतेय की, अरे देवा! माझ्या मुलाने माझ्या वडिलांना खाल्ले.
चिमुकल्याने खाल्ली आजोबांची अस्थी राख
नताशाचा दाव आहे की, तिने अस्थीकलश लिव्हिंग रुममधील एका उंच कपाटावर ठेवला होता, जिथपर्यंत चिमुकला पोहोचूदेखील शकत नव्हता. पण, तो कसा तरी तिथे पोहोचला आणि त्याने आजोबांची अस्थी राख खाल्ली.
व्हिडीओत तो चिमुकला कोआ पूर्णपणे राखेत माखलेला दिसतोय आणि घरभर ती राख पसरवतोय. यावर त्याची आई नताशा म्हणते की, माझे वडील असते तर यावर खूप हसले असते. त्यांनी कोआहला कधीच पाहिले नाही, पण आता ते नेहमीच त्याच्याबरोबर असतील.
नताशाने पोस्ट केलेल्या या घटनेचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय, ज्यावर अनेक जण भरभरून कमेंट्स करतायत. काहींनी म्हटले की, ती एप्रिल फूल करतेय. पण, यावर नताशाने स्पष्ट केले की, हे खरोखरंच असं घडलं आहे, मी या धक्क्यातून अद्याप बाहेर आलेली नाही. एका युजरने लिहिले की, “आजोबांचा नाश्ता.” दुसऱ्याने लिहिले की, “आता तुम्ही मुलाला म्हणू शकता की, तुझ्यात आता आजोबांचे सर्व गुण आहेत.”