Viral video: अनेक जण मस्त वाटतं, शरीर मोकळं होतं यासाठी मसाज घेतात. सलूनमध्ये जाऊन मसाजसाठी पैसे खर्च करतात. मात्र हे आपल्यासाठी किती योग्य आहे याचा विचार करत नाही. तसेच अनेकांना सारखी मान मोडायची सवय असते. सलूनमध्ये दुसऱ्याच्या हातूनही हे मान मोडून घेतात. अशीच चूक एका तरुणानं केली अन् पुढे जे घडलं ते पाहून तुमच्याही पायाखालची जमीन सरकेल.
व्हायरल व्हिडिओत एक व्यक्ती सलूनमधील खुर्चीवर बसलेली आहे आणि दुसरी व्यक्ती त्याला डोक्याची मसाज करत आहे. काही वेळाने, मसाज करणारा व्यक्ती हात दाबून देतो, पण काही सेकंदातच त्याने मानेचे फिरवले, ज्यामुळे खुर्चीवर बसलेला व्यक्ती अचानक पडतो आणि त्याची मान मोडते. एवढंच नाहीतर त्याला अर्धांग वायूचा झटकाही येतो. संपूर्ण घटना सलूनमधील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. सलूनमधील घटनेचा व्हिडिओ सध्या इन्स्टाग्रामवर व्हायरल होत आहे, जो ”@vvbuzzz” या अकाउंटवर पोस्ट केला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये ”सलूनमध्ये मान मोडणे किती धोकादायक ठरू शकते” असे लिहिले आहे. व्हिडिओ कुठल्या शहरात घडला हे स्पष्ट झालेले नाही, पण सध्या तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
स्ट्रोक म्हणजे लकवा किंवा अटॅक. मेंदूपर्यंत रक्त पुरवणारी धमनी जेव्हा फाटते तेव्हा व्यक्तीला अचानक स्ट्रोक येऊ शकतो. स्ट्रोक हा प्रामुख्याने वृद्ध लोकांमध्ये आढळून यायचा; पण गेल्या काही दशकांपासून तरुण-प्रौढ मंडळींमध्ये याचे प्रमाण वाढताना दिसत आहे. मात्र, सध्या समोर आलेलं प्रकरण चिंता वाढवणारं आहे. त्यामध्ये सलूनमध्ये हेड मसाज करून घेणं एका तरुणाला चांगलंच महागात पडलंय. अशा स्थितीत तुमच्या मनात हा प्रश्न नक्कीच निर्माण होत असेल की, डोकं दाबल्यानंतर ब्रेन स्ट्रोक होऊ शकतो का? उत्तर आहे, होय. चुकीच्या ठिकाणी दाबल्याने मेंदूच्या मज्जातंतूंमध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो; ज्यामुळे स्ट्रोक येऊ शकतो.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> VIDEO: “म्हणून कुणालाच कमी समजू नका” एवढ्याशा कोंबड्यानं कुत्र्याची काय अवस्था केली पाहाच
स्ट्रोकची लक्षणे आणि प्रभावी उपचार
चेहरा : चेहऱ्याच्या एका बाजूला ताण येतो.
हात : हात वर केल्यावर लगेच खाली पडतो का तपासा
बोलण्यातील स्पष्टता : बोलताना उच्चार अचानक अस्पष्ट किंवा गोंधळल्यासारखे होतात.
यापैकी कोणतीही लक्षणे दिसल्यास ताबडतोब आपत्कालीन वैद्यकीय मदत घ्या.
डॉ. रेंजेन पुढे म्हणतात की चक्कर येणे, मळमळ व गडबड हेदेखील मानेच्या हाताळणीमुळे स्ट्रोकचे संकेत देऊ शकतात. यावेळी डॉक्टरांचा त्वरित सल्ला घेणे आवश्यक आहे. जलद उपचारांमुळे मेंदूचे नुकसान कमी होऊ शकते आणि बरे होण्याची शक्यता वाढू शकते.