Indigo viral video: जर तुम्ही विमानानं प्रवास करत असाल तर तुम्हाला टर्ब्युलन्स हा शब्द माहीत असेलच. अगदीच सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास विमानाला झटके बसणं किंवा ते इकडं तिकडं हलणं-डोलणं याला टर्ब्युलन्स म्हणतात.उड्डाणाच्या वेळी विमान थोडं इकडे तिकडे डोलू लागतं. त्यामुळं प्रवासी काही वेळा घाबरतात. पण विमानात घडणारी ही घटना अगदी सामान्य आहे. अलीकडच्या काळातील अत्याधुनिक विमानांना कोणताही धोका नसतो. जेव्हा असं घडतं, तेव्हा ज्या लोकांनी सीटबेल्ट लावला नाही, असेच लोक जखमी होण्याची शक्यता असते. सध्या समोर आलेल्या घटनेमध्येही इंडिगोच्या विमानात असंच काहीसं झालं मात्र टर्ब्युलन्स नव्हतं तर कंपनीचा हलगर्जीपणा होता. विमान हवेत जाताच काही प्रवाशांना जोरदार झटका बसला. यानंतर याचं कारण समोल आलं आणि सर्वांनाच धक्का बसला. याचा व्हिडीओ पाहून तुम्हीही संताप व्यक्त कराल.
दिल्लीहून लखनऊला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात एक भयानक क्षण घडला जेव्हा टेकऑफनंतर एका प्रवाशाची सीट जोरात हलू लागली. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, तीन प्रवासी सीट्सच्या एका रांगेत बसलेले दिसतात यावेळी त्यांना जोरात झटका बसतो आणि ते अचानक हलू लागतात. यावेळी असं लक्षात येतं की, तीनही सीट्स तुटल्यामुळे त्या हलत आहेत. अशाप्रकार तपासणी न केल्यानं प्रवासी संतापले. याचा व्हिडीओ एका तरुणानं सोशल मीडियावर शेअर करच इंडिगो कंपनीवर टीका केली आहे. या तरुणानं तक्रार केल्यानंतर, लँडिंगनंतर देखभाल कर्मचाऱ्यांनी समस्येची तपासणी करण्याची व्यवस्था केली. तसेच घडलेल्या प्रकारासाठी विमान कंपनीने माफी मागितली आणि चौकशीचे आश्वासन दिले.
प्रवासी दक्ष सेठी यांनी लिहिले, “जेव्हा हे पहिल्यांदा घडले, तो खरोखरच एक भीतीदायक अनुभव होता. मी याआधी असे काहीही अनुभवले नव्हते. अक्षरशः सीट पुढे-मागे होत होती.” ते पुढे म्हणाले की केबीन क्रूनं त्यांना ताबडतोब रिकाम्या जागांवर हलवले आणि देखभाल कर्मचाऱ्यांनाही बोलावले. तो पुढे म्हणाला, “कोणत्याही वैद्यकीय समस्या असलेल्या वृद्ध व्यक्तीने उडत्या विमानात अशा सीटवर बसावे असे मला वाटत नाही.”
पाहा व्हिडीओ
या घटनेवर सोशल मीडिया वापरकर्त्यांनी प्रतिक्रिया दिल्या. एका वापरकर्त्याने लिहिले, “तुम्ही तुमचा अनुभव कसा शेअर केला आणि एअरलाइन्सना त्यांचे काम योग्यरित्या न केल्याबद्दल टीका केली नाही हे मला आवडले.” दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले, “स्पर्धेच्या अभावामुळे आजकाल हे खूप जास्त होत आहे. गेल्या ७/८ महिन्यांत इंडिगो सर्वात वाईट स्थितीत आहे. मी @indigo.6e सोबत २ वेळा प्रवास केला आहे, ज्यामध्ये दोन्ही वेळा सीट खराब झाल्या होत्या.”