Shocking video: सोशल मीडियावर दिवसभरात भरपूर व्हिडीओ व्हायरल होतात. यामध्ये निरनिराळ्या प्रकारचे व्हायरल व्हिडीओ पहायला मिळातात. मजेशीर, भावनिक, विचित्र, धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर नेहमीच सगळ्यांचं लक्ष वेधून घेतात. मात्र काही काळापासून असे काही व्हिडीओ व्हायरल होत आहेत ज्यामध्ये अचानक लोकांचे मृत्यू होत आहेत. अन्न खाताना, व्यायामशाळेत व्यायाम करताना किंवा नाचत असतानाही लोकांचा अचानक मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या. यामध्ये आता आणखी एका व्हिडीओची भर पडली आहे. हल्ली हार्ट अटॅक किंवा स्टॉक्सचे प्रमाण लोकांमध्ये वाढले आहेत. काही काळापूर्वी अटॅक फक्त वृद्ध लोकांना येत होते. परंतू आता तरुण आणि अगदी लहान मुलांना देखील हे येत आहे. यासंबंध काही व्हिडीओ ही सोशल मीडियावर समोर आले आहे. जे तुम्ही पाहिले ही असतील. हे व्हिडीओ हृदयाचे ठोके चुकवणारे असतात.
असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. मध्य प्रदेशमध्ये इंदौर येथे एका व्यक्तीचा हार्ट अटॅकने मृत्यू झालाय. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून व्हिडीओ पाहून तुम्हीही अवाक् व्हाल.धक्कादायक म्हणजे, कामावर गेला होता, दरवाजा उघडत होता, त्याचवेळी हार्ट अटॅक आला अन् भयानक मृत्यू झाला.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, हा व्यक्ती कंपनीचे दार उघडत असतानाच अचानक हार्ट अटॅक आला अन् जमिनीवर कोसळला. त्याला तात्काळ रूग्णालयात नेण्यात आले, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.या तरुणाला ज्याप्रकारे मरण आलं आहे हे पाहून असा शेवट कुणाचाही होऊ नये असं तुम्हीही म्हणाल.
पाहा व्हिडीओ
सोशल मीडियावर हा व्हिडीओ dainik_agniban नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.
सीपीआर म्हणजे काय?
हृदयविकाराचा झटका आल्यावर सीपीआर देतात म्हणजे नेमके काय? तर सीपीआरचा अर्थ कार्डिओ पल्मोनरी रिससिटेशन. एखादी व्यक्ती आजारी पडली, तिची शुद्ध हरपली, ती श्वासोच्छवास करीत नाहीये किंवा श्वास मंदावला आहे, अशी कोणाचीही स्थिती उदभवल्यास सीपीआर दिला गेला पाहिजे. या उपचार प्रक्रियेद्वारे त्या व्यक्तीच्या फुप्फुसाला ऑक्सिजनचा पुरवठा होतो. छातीवर दाब देणे आणि तोंडाद्वारे ऑक्सिजनचा पुरवठा केला जातो.