Shocking video: सोशल मीडियावर प्राण्यांशी संबंधीत तुम्ही अनेक व्हिडीओ पाहिले असतील. हे व्हिडीओ कधी थरारक असतात. तर काही व्हिडीओ हे मजेदार असतात. काही वन्य प्राणी असे असतात की ते जंगलात असो किंवा दुसरीकडे कुठे, त्यांची भीती कायम असते. यात सिंह आणि वाघांचा क्रमांक पहिला येतो. ते जगातील सर्वात भयानक प्राण्यांपैकी एक मानले जातात, जे मानवांवर देखील हल्ला करण्यास मागेपुढे पाहत नाहीत. त्यांना भूक लागली तर ते कोणालाही आपला बळी बनवू शकतात. यामुळेच या धोकादायक प्राण्यांना पिंजऱ्यात बंद करूनही लोक त्यांच्याजवळ जाण्यास टाळाटाळ करतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्याने यूजर्सला धक्का बसला आहे. यामध्ये मालकावर वाघाने केलेल्या हल्ल्याचा हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल.
वाघ वळतो आणि त्याच्या मालकावर वार करतो
या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक माणूस जाड साखळीने बांधलेल्या मोठ्या वाघाला घेऊन चालताना दिसत आहे. मात्र, यादरम्यान वाघाला राग येतो आणि तो त्या व्यक्तीला ओढू लागतो. तो प्रथम त्या व्यक्तीला काही अंतरावर खेचतो आणि नंतर वळतो आणि त्याच्यावर झडप मारत वार करतो. वाघाच्या धक्क्यामुळे ती व्यक्ती जमिनीवर कोसळते. जमिनीवर पडल्यावर वाघ येतो आणि त्याला चावू लागतो. दरम्यान, दुसरी व्यक्ती येऊन वाघाला ताब्यात घेण्याचा प्रयत्न करते. दोघेही हातात काठ्या घेऊन वाघाशी लढताना दिसत आहेत. काही वेळ अथक परिश्रमानंतर वाघ आटोक्यात येतो. या संपूर्ण प्रकरणामध्ये समाधानाची बाब म्हणजे या हल्ल्यात व्यक्तीला कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही. मात्र, व्हिडिओने युजर्सना नक्कीच घाबरवले आहे.
पाहा व्हिडीओ
https://www.instagram.com/reel/DGN5My1N4Wj/?utm_source=ig_web_copy_link
सोशल मीडियावर हा व्हिडीओ nouman.hassan1 नावाच्या युजरने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे, यावर आता नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने म्हटले की, “वाघ हे जंगलात राहणारे प्राणी आहेत. त्यांना अशाप्रकारे बेड्या ठोकून ठेवणे योग्य नाही.” आणखी एका युजरने लिहिले की, “वाघ हा पाळीव प्राणी नाही… या लोकांवर कोणत्याही क्षणी आपत्ती येऊ शकते.”तिसऱ्या युजरने लिहिले, “पण ते वाघांवर का नियंत्रण ठेवत आहेत, त्यांना जंगलात मुक्तपणे राहण्याची परवानगी द्या.”