Shocking video: मुंबई लोकल ट्रेनला मुंबईच हृदय म्हणतात. लोकल ट्रेन बंद पडली तर मुंबईच थांबते. अशी ही मुंबईचा जीव असणारी लोकल ट्रेन सध्या वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. मुंबई लोकलमधील भांडणाचे आणि मारामारीचे सत्र वाढतच चालले आहे. गेल्या काही दिवसांपासून ट्रेनमध्ये झालेल्या मारामारीचे आणि भांडणांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये महिलांमधील हाणामारी काही नवीन नाही. जागेच्या वादातून महिलांमध्ये तुफान मारामारीचे अनेक व्हिडीओ आपण पाहिले आहेत.
दररोज लाखो लोक रेल्वे प्रवास करतात, ज्यात विविध ठिकाणांहून आलेले प्रवासी असतात. दगदगीच्या जीवनात रेल्वे प्रवास एक प्राधान्य ठरतो. यामध्ये अनेक वेळा काहीतरी वेगळं आणि नवीन पाहायला मिळतं. रेल्वेमधील भांडणं साधी नसतात, विशेषत: महिलांमधील वाद. काही वेळा या भांडणांमध्ये शाब्दिक चकमकीचं रूप घेतलं जातं, तर कधी त्या हाणामारीपर्यंतही पोहोचतात. ट्रेनचा प्रवास हे सामान्यांच्या आयुष्याचे एक रोजचे समीकरण झाले आहे. रोज लाखोंच्या संख्येने लोक ट्रेनने प्रवास करत असतात. वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेले लोक ट्रेनच्या प्रवासाला जास्त प्राधान्य देतात.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, लोकलमधील महिलाच्या डब्ब्यात काही महिलांचा वाद सुरु असलेला दिसत आहे. सुरुवातील हा वाद शाब्दिक असतो. त्यानंतर एक महिला दुसऱ्या महिलेला जोरदार मारताना दिसते. काही वेळातच ही हाणामारी इतकी टोकाला पोहोचते की इतर प्रवाशांनाही हस्तक्षेप करावा लागला. या मारहाणीचं स्वरुप इतकं भयंकर होतं की यामध्ये दोन महिलांना रुग्णालयात उपचारासाठी पाठवावं लागलं आहे.
पाहा व्हिडीओ
तुम्हीही ट्रेनचा प्रवास करत असाल तर भांडण हे तुमच्यासाठी काही नवीन नसेल. ट्रेनमध्ये वादाची ठिणगी पेटायला काही वेळ लागत नाही. त्यातही महिलांची भांडण म्हणजे काही खरे नाही. अशीच भांडणं डोंबिवली रेल्वे स्टेशनवर झाली ज्यामध्ये दोन महिलांमध्ये जोरदार हाणामारी झालीय. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल.अशा प्रकारच्या घटनांमुळे प्रवासाची हवा बदलून जाते, आणि अशा भांडणांमुळे इतर प्रवाशांनाही त्रास होतो. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने अशा घटनांवर अधिक लक्ष देण्याची आवश्यकता आहे.