Shocking video: सोशल मीडियावर व्हायरल होण्याची क्रेझ इतकी वाढली आहे की लोकांना काहीही करून व्हायरल व्हायचे आहे. त्यासाठी स्वत:चा व इतरांचा जीव पणाला लावावा लागला तरी चालेल. रील माफियांना पोलिस आणि कायद्याची भीती तर नाहीच पण आपला जीव गमवावा लागण्याचीही भीती राहिलेली नाही. आपण सिनेमांमध्ये अनेक वेळा हिरोला स्टंट करताना पाहिलं असेल. मात्र खऱ्या आयुष्यातही काही तरुण असे अनेक स्टंट करतात, जे पाहून आपल्या अंगावर काटा उभा करतात. तर बरेच लोक असे देखील असतात, जे स्टंट करायला जातात खरं, परंतु त्यांच्यासोबत असं काहीसं घडतं, ज्याचा आपण विचार देखील करु शकत नाही. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनाही घाम फुटला आहे.

काही मंडळींना स्टंटबाजी करण्याची फारच हौस असते. ही मंडळी संधी मिळताच चित्र-विचित्र स्टंट करून लोकांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करतात. पण, ही स्टंटबाजी काही वेळेस अंगाशीसुद्धा येते. स्टंटबाजांना नको त्या ठिकाणी मार बसतो आणि आयुष्यभरासाठी अपंगत्व येतं. अशाच व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एका तरुणला स्टंटबाजी करणे चांगले महागात पडले आहे. हा तरुण धावत्या ट्रेनसमोर स्टंट करण्याचा प्रयत्न करत असून याचवेळी त्याच्यासोबत असे काही घडते की, यामुळे तो आपल्या जीवाला मुकला असता. एककीडे ट्रेन वेगाने प्लॅटफॉर्मवर येत आहे, दुसरीकडे हा तरुण स्टंटबाजी करत आहे. शेवटी काय घडतं तुम्हीच पाहा.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक रेल्वे स्टेशन दिसत आह, यावेळी प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी आहे. एका बाजूने ट्रेन प्लॅटफॉर्मवर वेगाने येत आहे. याच वेळी एक तरुण प्लॅटफॉर्मवर स्टंट करत आहे. हा तरुण कोलांटी उडी मारतो. कोलांटी उडी मारताना तरुणाचा तोल जातो आणि याच वेळी एक आजोबा त्याच्यामागून जात असतात तेव्हा त्यांचा धक्का त्या तरुणाला लागतो. यामुळे तरुण जोरात खाली आदळतो. तो आपल्या मानेवर आदळतो यामुळे त्याच्या मानेला जोरदार फटका बसतो. कोलांटी उडी मारण्याच्या दरम्यान दुसऱ्या बाजूने ट्रेन येते असते. जर त्याचा तोल जाऊन तो रेल्वे रुळावर पडला असता तर त्याचा जीव गेला असता. एवढ्या मोठ्या प्रमाणात रिस्क घेऊन हा तरुण स्टंटबाजी करताना पाहून तुमचाही थरकाप उडेल.

पाहा व्हिडीओ

View this post on Instagram

A post shared by ƒυηηу мємєѕ ? (@comedy__boy21)

हा व्हिडीओ एक्सवर comedy__boy21 नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे; ज्याला १४ हजार व्ह्युज मिळाले आहेत. त्यावर लोक आपापल्या प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने लिहिले- मला वाटते की, या मुलांना फटके दिले पाहिजेत. तर दुसऱ्याने लिहिलेय की, प्राणापेक्षा जास्त आहेत. एका युजरने लिहिलेय की, अशा लोकांना फक्त पोलिसांचा लाठीमारच सुधारू शकतो.

Story img Loader