Shocking video: तुम्ही अशा काही लोकांना पाहिलं असेल जे मोबाईलवर बोलताना एका जागी थांबत नाही आणि बोलता बोलता चालत कुठे जातात ते त्यांनाही समजत नाही. अशीच एक मुलगी मोबाईलवर गप्पा मारत चक्क रेल्वे ट्रॅकवर पोहोचली. पोहोचली ती पोहोचली पण ती तिथंच बसली आणि त्याचवेळी ट्रेन आली आणि तिच्यावरून धडाधड गेली. या धक्कादायक व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

तर या व्हिडिओच्या सुरुवातीला एक ट्रेन अतिशय वेगाने येताना दिसते. ट्रेन जशी पुढे जाते तशी रल्वे रुळावरुन एक तरुणी उठताना दिसते. म्हणजे ट्रेन जात असताना ही तरुणी रेल्वे रुळांवर झोपलेली असते. विशेष म्हणजे ही तरुणी रुळांवरुन उठते तेव्हा तिच्या हालचालींमध्ये कुठेही घाबरल्याचे भाव नसतात. तर ही तरुणी चक्क निवांत फोनवर बोलत बोलत रुळांच्या बाहेर येते आणि प्लॅटफॉर्मवर येण्याचा प्रयत्न करते. या तरुणीला अशाप्रकारच्या अपघाताची जणू सवयच असल्याचे तिच्या निवांतपणातून दिसून येते. तिच्याकडून थोडीही चूक झाली असती तर हा प्रसंग तिच्या जीवावर बेतणारा होता, मात्र याचे तिला काहीच पडलेले नसल्याचे दिसून येते.

suresh dhas prajakta mali on santosh deshmukh murder
Prajakta Mali: प्राजक्ता माळीचं नाव का घेतलं? सुरेश धस यांनी केलं स्पष्ट; तक्रारीच्या मुद्द्यावर म्हणाले…
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
A woman filming a reel in the middle of the road caused a major disruption in Nawanshahr leading to a traffic jam
“अहो काकू… हे काय करताय?” भररस्त्यात ठेवली खुर्ची, त्यावर ठेवला मोबाईल अन् बिनधास्तपणे नाचू लागली महिला; Viral Video पाहून संतापले नेटकरी
Sandeep Kshirsagar on Viral Photo
Sandeep Kshirsagar: तरुणीबरोबरच्या त्या व्हायरल फोटोवर आमदार संदीप क्षीरसागर यांची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “तो फोटो…”
Man Travelled Hanging Under Train
Madhya Pradesh : धक्कादायक! रेल्वेखाली चाकांजवळ लटकून तरुणाचा तब्बल २९० किलोमीटरचा प्रवास; Video व्हायरल
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : सारंगी महाजन यांचा आरोप; “धनंजय आणि पंकजा मुंडे या दोघांनी माझी जमीन लाटली, आणि..”
Hyderabad Shocking accident video: Two killed as bike loses control and hits divider in Madhapur Hyderabad
क्षणात सगळं संपलं! बाईकची डिवाइडरला जोरदार धडक; हवेत उडाले अन् जागीच… मृत्यूचा थरारक Video Viral

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक मुलगी रेल्वे प्लॅटफॉर्मवर उभी राहून फोनवर तिच्या बॉयफ्रेंडशी बोलत आहे. ती कॉलमध्ये इतकी गुंग झाली की समोरील परिस्थितीकडे लक्ष देण्यास विसरली. ती बोलत बोलता रेल्वे ट्रॅक पार करत असताना अचानक ट्रॅकवर पडते.व्हिडीओत तुम्ही पाहू शकता सुरुवातीला ट्रेन जाताना दिसते. ट्रेन पूर्णपणे गेल्यानंतर जिथून ट्रेन गेली त्या ट्रॅकवर एक मुलगी झोपलेली असल्याचं दिसते. तिच्या हातात फोन आहे.जशी ट्रेन जाते, तशी ती उठते आणि ट्रॅकवर बसते. तिच्या अंगावरून ट्रेन गेल्यानंतर आपल्याला धडकी भरते. पण मुलीला त्याचं काहीच नाही. ट्रेन तिच्यावरून धडधडत गेली तरी तिच्या चेहऱ्यावर किंचितशीही भीती नाही. ती आपली मोबाईलमध्ये बोलण्यात दंग आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> क्षणात सगळं संपलं! बाईकची डिवाइडरला जोरदार धडक; हवेत उडाले अन् जागीच… मृत्यूचा थरारक Video Viral

सोशल मीडियावर हा व्हिडीओ forest_creatures18 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकानं म्हंटलंय, “प्रेम अंधळं असतं ” तुम्हाला हा व्हिडीओ पाहून काय वाटलं ते आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया देऊन आम्हाला नक्की सांगा.

Story img Loader