रेल्वेचा प्रवास करताना अनेक लोकांच्या वस्तू गहाळ किंवा चोरीला गेल्याचं आपण ऐकलं असेल. शिवाय चोरीला गेलेल्या वस्तू महाग आणि महत्वाच्या असल्याने नागरिक या वस्तूं परत मिळवण्यासाठी रेल्वे पोलिसांची मदत घेतात. मात्र, सध्या एका प्रवाशाने आपले शूज चोरीला गेल्याची तक्रार रेल्वे पोलिसांकडे केली आहे. शिवाय रेल्वे मदद’ अॅपवर देखील त्याने तक्रार नोंदवली आहे. त्याच्या या तक्रारीची चर्चा सोशल मीडियावर जोरदार सुरु आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बिहारमधील मुझफ्फरपूर येथील रेल्वे पोलिस ठाण्यात एका पोलिसाने धावत्या रेल्वेमधून आपले शूज चोरी झाल्याची तक्रार दिली आहे. त्याच्या तक्रारीवरुन आता त्याचा शूजचा तपास देखील पोलिसांनी सुरु केला आहे. पण या युवकाने तक्रार देण्यासाठी तक्रार अर्ज लिहला आहे त्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर जोरदार सुरु आहे.
आणखी पहा- Video: अशी गर्लफ्रेंड नको रे देवा! बाईकवरून फिरत होतं जोडपं, पोरीने कॅमेरा सुरू केला अन् तितक्यात…
त्याने तक्रार दाखल करण्यासाठी लिहलेल्या पत्रात म्हटलं आहे की, महोदय, माझं नाव राहुल अजय कुमार झा वय वर्ष २३ असून, मी बलगांव दक्षिण जिल्हा सितामडी येथील रहिवासी आहे. मी २८ ऑक्टोबरला रेल्वेने प्रवास करत असताना. रात्रीच्या दरम्यान माझी झोप लागली. मला जाग आली तेंव्हा माझ्या बर्थच्या खाली माझे शूज नव्हते. माझे शूज हे कॅम्पस मॅक्सिको कंपनीचे होते. ते कोणत्या तरी अज्ञाक व्यक्तीने चोरले आहेत. तरी माझे शूज चोरी करणाऱ्यावर कारवाई करावी.
आणखी वाचा- संतापजनक! उपचारासाठी आलेल्या महिलेचे केस खेचले नंतर कानाखाली मारल्या; डॉक्टरकडूनच रुग्णाला मारहाण
शिवाय या चोरीबाबत आपण रेल्वे मदक अॅपद्वारे तक्रार दिली आहे. त्या तक्रारीचा नंबर आहे २०२२-१०२९०-१९९१ आपला विश्वासी राहुल कुमार झा. असं पत्र तक्रारदाराने दिलं आहे. त्याच्या या तक्रारीनंतर आता दोन राज्यांचे पोलिस कामाला लागले आहेत. दरम्यान, राहुल कुमार झा यांचे शूज चोरीला गेले. त्याबाबतची तक्रार नोंदवण्यात आली असून चोरीला गेलेले शूज आणि चोरांना शोधण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे रेल्वे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.