Viral photo: आपला व्यवसाय, धंदा वाढावा, वस्तूंचा खूप खप व्हावा असे कोणत्या दुकानदाराला वाटणार नाही. यासाठी दुकानदार वेगवेगळ्या प्रकारे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी पोस्टर लावतात. कोणताही व्यवसाय फायदेशीर होऊ शकतो फक्त त्याची मार्केटींग करण्याचं स्किल तुमच्याकडे हवं. तुम्ही दुकानाच्या बाहेर वेगवेगळे पोस्टर, पाट्या पाहिल्या असतील. अनेकदा बंद दुकानाबाहेरही जाहिरातीच्या पाट्या, पोस्टर लावलेले असतात. यामध्ये दुकान भाड्याने देणे आहे, गाळा भाड्याने देणे आहे. तसेच कामासाठी मुली पाहिजेत असे पोस्टर असतात. असेच एका दुकानाबाहेरची पाटी सध्या चर्चेचा विषय बनली आहे. याचा फोटोही सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून नक्कीच या दुकानात ग्राहकांची गर्दी असणार.

पुणेकर त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण तिरकस स्वभावासाठी नेहमी ओळखले जातात. त्यात पुणेकरांच्या पुणेरी पाट्या ह्या नेहमीच चर्चेच्या विषय ठरतात. पुणेरी किस्से आणि पुणेरी पाट्या जगजाहीर आहेत. दरम्यान ही पुणेरी स्टाईल पाणी नेमकी कुठली आहे याबाबत माहिती मिळू शकलेली नाहीये. मात्र पाटी लिहणारा नक्कीच पुणेकर असणार असं नेटकरी म्हणत आहेत. दरम्यान यावेळी या पाटीवर कुणाचा अपमान केला नाहीये तर कृतज्ञता व्यक्त केली आहे. ग्राहकामुळेच आपलं पोट चालतं त्यामुळे ग्राहक हा दुकानदारांसाठी देवांप्रमाणे असतो, याच ग्राहकांप्रती कृतज्ञता या मालकां व्यक्त करण्यासाठी त्याच्या दुकानाबाहेर पाटी लावलीय.

Manoj Jarange News
Manoj Jarange : “मराठे निवडणूक लढवणार नाहीत, कारण एका जातीवर…”; मनोज जरांगेंची मोठी घोषणा
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
who are intersex people
इंटरसेक्स लोक कोण असतात? समाजात वावरताना त्यांना कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागतो?
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
Shocking video of girl heart attack during dance on stage video goes viral on social media
“मरण कधी येईल सांगता येत नाही” डान्स करताना स्टेजवर कोसळली ती पुन्हा उठलीच नाही; नेमकं काय घडलं? VIDEO आला समोर
Mrunal Thakur Comment on Diwali Edited Video
Mrunal Thakur Comment: “त्याचे प्रत्येक अभिनेत्रीबरोबर व्हिडीओ, माझं तर मन…”, चाहत्याचे एडिटेड व्हिडीओ पाहून मृणाल ठाकूरची खोचक टिप्पणी
Pramod Mahajan Death Poonam Mahajan
‘प्रमोद महाजनांच्या हत्येमागे गुप्त हेतू’; पूनम महाजन म्हणाल्या, “आता अमित शाह आणि देवेंद्र फडणवीसांना…”

आता तुम्ही म्हणाल असं काय लिहलंय या पाटीवर? तर या दुकानाबाहेरील पाटीवर ““ग्राहक” हे माझे पोट आहे. तो नाही तर मी उपाशी आहे” असा आशय मिळाला आहे. दुकानदारानं इतक्या प्रामाणीकपणे ही पाटी लावल्यानं ग्राहक खूश होऊन तिथेच जात आहेत. 

पाहा पाटी

हेही वाचा >> अरे देवा हे काय झालं! मंदिराच्या दानपेटीत चुकून iPhone पडला; त्यानंतर पुढे जे घडलं त्यानं भक्ताचं डोकंच चक्रावलं

सोशल मीडियावर हा फोटो gj_bhushantheexplorer नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला असून नेटकरीही यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकानं मालवणीत म्हंटलंय, “ह्या ज्याका कळला तो कधीच उपाशी मराचो नाय.. कलियुगात जो धर्मान वागतलो तोच तरतलो” तर आणखी एकानं “कृतज्ञता ही आयुष्य सुंदर बनवते” अशी प्रतिक्रिया दिली आहे. सोशल मीडियावर असा अनेक मजेशीर पुणेरी पाट्या नेहमी चर्चेत येत असतात जे नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतात आणि खळखळून हसण्यासाठी भाग पाडतात. पुणेकरी दुकानाबाहेर पाटी व्हायरल होण्याच्या ही काही पहिली वेळ नाही. याआधीही अशा पाट्या व्हायरल झाल्या आहेत.

Story img Loader