Funny Viral Post: सोशल मीडिया हे एक अद्भुत व्यासपीठ आहे. इथे सकाळपासून संध्याकाळपर्यंत असे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होतात, जे पाहिल्यानंतर लोकांचा मूड ताजातवाना होतो. कधी कधी आश्चर्यकारक व्हिडीओदेखील व्हायरल होतात; परंतु बहुतेक व्हिडीओ आणि फोटो असे असतात की, ते पाहून लोकांना हसायला भाग पाडलं जातं. बरं, आता दुकानाबाहेर लावलेली एक पाटी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जी दुकानदारानं ग्राहकांनी काही उधार मागू नये म्हणून लावली आहे. चला तर मग त्यानं असं काय लिहिलं आहे की, त्याचा फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहे, हे जाणून घेऊ…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ग्राहकांनी काही उधार मागू नये म्हणून दुकानदाराने काय केलं?

आपला उद्योग-व्यवसाय वाढावा, चांगला ग्राहकवर्ग मिळावा, या उद्देशानं बहुतांश दुकानदार आपापल्या दुकानाबाहेर पोस्टर्स वा पाट्या लावत असतात. या पोस्टर्स आणि पाट्यांमधून ग्राहकांपर्यंत संदेश जातो. परंतु, आता अशा एका पाटीनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे की, जिचा हिकमती वापर दुकानदारानं उधारी बंद करण्यासाठी म्हणून केला आहे.

अनेकदा असं घडतं की, लोक दुकानातून वस्तू खरेदी करतात; पण त्याच वेळी पैसे देत नाहीत. आता बहुतेक लोक एकाच दुकानातून वस्तू खरेदी करीत असल्यानं दुकानदार त्यांना नकारही देऊ शकत नाहीत. वाढती उधारी आणि फुकट्या ग्राहकांना कंटाळून या समस्येवर उपाय काढण्यासाठी एका दुकानदारानं अजब मार्ग शोधून काढला आहे. आता सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका विक्रेत्यानं उधारी बंद करण्यासाठी नवीनच मार्ग शोधल्याचे दिसत आहे. उधारीच्या समस्येतून सुटण्यासाठी एका दुकानदारानं ही युक्ती अवलंबली आहे.

त्यांनी एका पोस्टरवर लिहिलं होतं, “उधार फक्त ८०-९० वर्षांच्या लोकांनाच मिळेल आणि तेही त्यांच्या पालकांना विचारून!” त्यानंतर ती दुकानाबाहेर चिकटवण्यात आली. आता तुम्हाला समजले असेलच की, त्या व्यक्तीने उधारी बंद करण्यासाठी कोणती युक्ती केली आहे. आता या पाटीची चर्चा सध्या सगळीकडे जोरात सुरू आहे.

येथे पाहा व्हायरल पाटी

हे पोस्टर मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म X (पूर्वीचे ट्विटर) वर @terakyalenadena नावाच्या खात्यासह शेअर केले आहे. हे पोस्टर सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. अनेक नेटकरी या पोस्टवर आपापल्या प्रतिक्रियाही देताना दिसत आहेत. ही पोस्ट पाहिल्यानंतर एकानं लिहिलं, “उत्तर देण्याचा योग्य मार्ग सापडला.” दुसऱ्यानं लिहिलं, “नकार देण्याची वेगळी पद्धत अवलंबली आहे”, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shopkeeper came up with a great trick to avoid giving credit to customers photo viral pdb