आर्टिफिशियल इंटेलिजेंसने (Artificial Intelligence) आजच्या जगात तंत्रज्ञानाचे नवे युग सुरू केले आहे. एआय चॅटबॉट चॅटजीपीटी करू शकतील अशा नवीन गोष्टी लोक दररोज शोधत आहेत. पण कोणास ठाऊक होते की, भारतीय रस्त्यावरील विक्रेते ही संकल्पना पटकन उचलून धरतील आणि तिचे व्यवसायिक कल्पनेत रूपांतर करतील!
ChaiGPT हा नवीन चॅटबॉट नव्हे
जुगाड करुन एखादे काम करणे आपल्याकडे सामान्य गोष्ट आहे. लोक काय जुगाड करतील याचा अंदाज लावणे आम्ही chatGPT नव्हे तर ChaiGPTबाबत बोलत आहोत. हा काही नवीन चॅटबॉट नाही जो तुम्हाला एक कप चहा देईल. हे देशातील एका चहाच्या दुकानाचे नाव आहे.
हेही वाचा – Bikini Airline: विमानात बिकनी परिधान करतात हवाई सुंदरी? भारतीय देखील करू शकतात प्रवास
ChaiGPT चहाच्या दुकानाला दिले नाव
स्वाती नावाने असलेल्या ट्विटर अकांउटवर हा फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये ChaiGPT नाव असेलेल्या चहाच्या दुकानाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “सिलिकॉन व्हॅली: आमच्याकडे असलेली सर्वोत्तम स्टार्ट-अप कल्पना म्हणजे भारतीय चहाची दुकाने: माझा चहा घ्या,” दुकानाच्या साइनबोर्डवर ‘शुद्ध चहा’ असा दावादेखील केला आहे.
Chat नव्हे ChaiGPT
या पोस्टला 27 हजारांहून अधिक लोकांनी पाहिले आहे आणि तर अनेक कमेंट् करुन प्रतिक्रिया दिल्या आहेत. अशा अनोख्या नावाच्या दुकानात चहा घेण्याची उत्सुकता व्यक्त करण्यापासून ते रस्त्यावरील फेरीवाल्यांच्या जुगाड कल्पनेने थक्क होण्यापर्यंत लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.