आजकाल दूध, मसाल्यांपासून खाण्याच्या अनेक पदार्थांमध्ये भेसळ केली जात असल्याचे पाहायला मिळते. सोशल मीडियावरही खाद्यपदार्थांमधील भेसळीचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातही भाज्यांपासून फळांपर्यंत अनेक गोष्टींवर रसायनांचा वापर होताना दिसतो. कमी कालावधीत जास्त नफा मिळविण्यासाठी व्यापारी आणि काही विक्रेते फळांवर रासायनिक पदार्थांचा वापर करतात. अशी रसायनयुक्त फळे शरीरासाठी अत्यंत हानिकारक आहेत. त्याच्या दुष्परिणामांमुळे त्वचारोग, पोटाचे विकार आणि कॅन्सरसारख्या दुर्धर आजारांनाही आमंत्रण मिळत आहे. त्यामुळे हल्ली लोक काही बाहेरच पदार्थ खाणे सोडून नैसर्गिकरीत्या पिकवलेली फळे, भाज्या खाण्याला प्राधान्य देतात. पण, आता फळे, भाज्यांमध्येही विष मिसळले जात असल्याचे पाहायला मिळत आहे.

सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये एक फळ विक्रेता सफरचंदे अधिक लाल दिसण्यासाठी सफरचंदाला लाल रंग देताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये विक्रेत्यासमोर काही पांढरी फिकट पडलेली सफरचंदे दिसत आहेत. तिथेच लाल रंगाच्या पाण्याची मोठी वाटी आहे. तो विक्रेता ब्रशच्या मदतीने सफरचंदाला रंग लावताना दिसत आहे. अशा प्रकारे एकेक करून लाल रंगाने रंगवून सुकवत ठेवलेली काही सफरचंदेदेखील दिसतायत.

तृतीयपंथीने भररस्त्यात उतरवली स्वत:चीच पॅन्ट अन् ई-रिक्षाचालकाला केली बेदम मारहाण; घटनेचा VIDEO व्हायरल

फळांना अशा प्रकारे रासायनिक रंग लावत असल्याचा धक्कादायक व्हिडीओ @Tiwari__Saab नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, ‘ही बाजारातील स्थिती आहे. कोहीही विश्वास ठेवण्याजोगा नाही. त्यामुळे बाजारातून फळे विकत घेताना ती बघून घ्या. तो सफरचंदाला कशा प्रकारे रंगवीत आहे ते तुम्ही पाहू शकता.

हा व्हिडीओ नेमका कुठला आहे आणि कधी शूट करण्यात आला आहे याची कसलीही माहिती समोर आलेली नाही. पण, तो आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिला आहे; ज्यावर युजर्सनी वेगवेगळ्या प्रतिक्रियादेखील दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय की, आजकाल खूप धोकादायक काम होत आहे. आणखी एका युजरने म्हटलेय की, हे खूप भीतीदायक आहे. आता मला बाजारातून काहीही खरेदी करावेसे वाटत नाही. तिसऱ्या युजरने लिहिलेय की, व्हायरल होऊनही या लोकांवर कारवाई का होत नाही. ते लोकांच्या आरोग्याशी खेळत आहेत. शेवटी एका युजरने लिहिले की, आजकाल कोणावरही विश्वास ठेवू नये. लोक काय करतील माहीत नाही.