Bra Size Drinks Free Offer: वीकेंडला पार्टी करण्याचा प्लॅन अलीकडे सगळ्याच शहरांमध्ये कॉमन झाला आहे. अर्थात आठवडाभर कठोर परिश्रम घेतल्यावर दोन दिवस जरा मेंदूला विश्रांती देण्यासाठी मित्रांसह केलेले हे प्लॅन्स खूप मदत करून जातात. पार्टी करण्यासाठी इच्छुक वाढती मंडळींची संख्या पाहता अनेक शहरांमधील क्लब्स व पब्सची संख्याही वाढत आहे. अधिकाधिक ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी क्लब्स व पब्समध्ये वेगवेगळ्या ऑफर्स दिल्या जातात. अशीच एक भन्नाट कल्पना आणली होती पण यावरून आता या क्लबच्या मालकांना प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. अशी ही ऑफर होती तरी काय व त्याचा कसा पडसाद उमटला आहे हे ही पाहूया..
तर अनेक आंतरराष्ट्रीय मीडिया रिपोर्टनुसार, एका वूलशेड ऑन हिंडले या क्लबच्या मालकाने महिलांसाठी मोफत ड्रिंकची ऑफर दिली होती. पण यात एक अट होती, महिलांच्या ड्रिंकचा प्रकार व प्रमाण हे त्यांच्या ब्रा साईजवर अवलंबून असेल असे संगणयत आले होते. म्हणजे A – ब्रा साईझच्या महिलांना एक मोफत ड्रिंक तर B- ब्रा साईझ असणाऱ्यांना २ ड्रिंक, C- कप असणाऱ्या महिलांना तीन ड्रिंक फ्री मिळणार असल्याचे सांगण्यात आले होते.
हे ही वाचा<< २०० वर्षीय बौद्ध भिख्खू जेव्हा आशीर्वाद देतात… Viral Video पाहून नेटकरी भारावले पण मूळ सत्य वाचून व्हाल चकित
बरं या ऑफरचा विचित्रपणा इथेच थांबत नाही तर पुढे असंही सांगण्यात आले होते की महिलांना क्लबमध्ये आल्यावर आपली ब्रा काढून सुद्धा दाखवावी लागू शकते. जेव्हा ‘द बिग, द बेटर’ असं लिहिलेल्या या ऑफरच्या जाहिराती व बॅनर्स शहरात लावण्यात आल्या तेव्हा यावरून अनेकांनी प्रचंड टीका केली होती. हा सर्व प्रकार अंगाशी आल्याचे दिसून आल्यावर क्लबकडून जाहिराती मागे घेण्यात आल्या होत्या तसेच या क्लबच्या अधिकाऱ्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत खेद व्यक्त करून माफीही मागितली होती.