युक्रेनमधील मारियुपोल येथे रशियन सैन्याच्या गोळीबारात गंभीर जखमी झाल्यानंतर सहा वर्षांच्या मुलीला रुग्णालयात नेतानाचा एक फोटो व्हायरल झाला आहे. या मुलीची आई रुग्णवाहिकेच्या बाहेर उभी होती आणि तिचे वडील रक्ताने माखलेले दिसत होते. या मुलीला स्ट्रेचरवर ठेवून रुग्णालयात नेण्यात आलं, तिथे डॉक्टरांनी तिला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, डॉक्टर तिला वाचवू शकले नाहीत. त्यानंतर संतापलेल्या डॉक्टरांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

Ukraine War: “एका व्यक्तीच्या इगोमुळं संपूर्ण जगाला त्रास सहन करावा लागतोय, लोकशाही टिकवणं हे…”

Vallari Viraj
‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेतील अभिनेत्रीने शेअर केले बालपणीचे गोंडस फोटो; नेटकरी म्हणाले, “अशीच आयुष्यभर…”
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
ukraine nuclear bomb
रशिया-युक्रेन संघर्ष अणुयुद्धात बदलणार? युक्रेनची अणुबॉम्बची तयारी? काय होणार जगावर परिणाम?
reality about donald trump and vladimir putin friendship
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन खरोखर एकमेकांचे मित्र आहेत का? दोघांच्या मैत्रीत युक्रेनचा ‘बकरा’?
Chennai Doctor Attack
Chennai : कॅन्सरग्रस्त महिलेच्या मुलाचा डॉक्टरवर चाकुने हल्ला; मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
mallikarjun kharge replied pm narendra
“पंतप्रधान मोदी म्हणजे ‘झुटों के सरदार’, त्यांनी हेच लाल संविधान…”; ‘त्या’ टीकेला मल्लिकार्जून खरगेंचं प्रत्युत्तर!
Navri Mile Hitlarla
एजेवर येणार मोठे संकट, श्वेताच्या ‘त्या’ कृतीमुळे होणार अटक; ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिका नव्या वळणावर
Vladimir putin Narendra Modi Reuters
Vladimir Putin : “भारत जागतिक महासत्तांच्या यादीत हवा”, पुतिन यांची स्तुतीसुमनं; म्हणाले, “त्यांचं भविष्य…”

असोसिएटेड प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, बाळाला ऑक्सिजन पंप करणाऱ्या एका डॉक्टरने म्हटलं की, “पुतिन यांना या मुलीचे डोळे आणि डॉक्टरांना रडताना दाखवा.” यावेळी मुलीचे वडील पाणावलेल्या डोळ्यांनी स्ट्रेचर धरून बसलेले दिसले. या फोटोने जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी बॉम्बस्फोट सुरू झाले तेव्हा पीडितेचे कुटुंब दक्षिणपूर्व बंदरगाह शहराच्या बाहेरील एका सुपरमार्केटमध्ये होते.

VIDEO: रशियन सैन्याला थांबवण्यासाठी तो टँकवर चढला, पण लष्करानं घेरलं अन्…..

रशियन आणि रशियन-समर्थित फुटीरतावादी सैन्याने तीन बाजूंनी सुमारे ४० लाख लोकसंख्या असलेल्या दक्षिण युक्रेनियन शहराला वेढा घातल्याने मारियुपोलच्या आसपास भीषण लढाई सुरू आहे. CNN च्या रिपोर्टनुसार, रशियन सैन्याने क्रिमीयाला दक्षिण रशियाशी जोडणारा लँड कॉरिडॉर पूर्ण करण्यासाठी मारियुपोल ताब्यात घेण्याची शक्यता आहे.

युक्रेनशी चर्चेसाठी रशिया तयार

मॉस्को : युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाबाबत युक्रेनी अधिकाऱ्यांशी बोलणी पुन्हा सुरू करण्यसाठी रशियाचे एक प्रतिनिधी मंडळ बुधवारी तयार असेल, असे क्रेमलिनच्या प्रवक्त्याने म्हटले आहे. मात्र ही बोलणी कुठे होतील याबद्दल त्याने काही सांगितले नाही. रशिया-युक्रेन युद्धावर तोडगा काढण्यासाठी बोलण्यांची पहिली फेरी गेल्या रविवारी बेलारूस- युक्रेन सीमेनजीक झाली होती. त्यातून काही निष्पन्न झाले नसले तरी दोन्ही बाजूंनी पुन्हा भेटण्याचे मान्य केले होते.