Shradhha Aftab Murder Case: वसईच्या श्रद्धा वालकर या तरुणीचा प्रियकर आफताब अमीन पूनावाला याने तिचा अत्यंत निर्घृण खून केल्याची घटना चर्चेत असताना आता आणखी एक हादरवून टाकणारा व्हिडीओ समोर येत आहे. मध्य प्रदेश मधील एका इसमाने एका २५ वर्षीय तरुणीचा खुन केल्याची माहिती समोर येत आहे. या इसमाने हत्येच्या नंतर तरुणीच्या मृतदेहासह एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता. जबलपूर मधील ही घटना मागील आठवड्यात घडली होती व तेव्हा पासून खुनाचा आरोपी अभिजित पाटीदार हा फरार आहे. आरोपीने शिल्पा झारिया या २५ वर्षीय तरुणीचा गळा चिरून खून केला होता व त्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या शिलापाच्या मृतदेहासह त्याने व्हिडीओ शूट केला होता.

जबलपूरच्या मेखला रिसॉर्ट येथील एका खोलीत हा सर्व प्रकार घडल्याचे समजत आहे. आरोपी अभिजीत या व्हिडिओमध्ये “बेवफाई नहीं करनेका”(विश्वासघात करायचा नाही) असे म्हणतो व मग बेडवर टाकलेले ब्लॅंकेट उचलतो, या ब्लॅंकेटखाली त्याने शिल्पाचा मृतदेह ठेवला होता. यापुढील एका व्हिडिओमध्ये अभिजीतने स्वतःची ओळख सांगत तो पाटणा येथील रहिवासी असल्याचे म्हंटले आहे, अभिजीतच्या व्यवसायातील सहकारी जितेंद्र कुमार याच्यासह शिलापचे अफेअर होते त्यामुळे त्याने शिल्पाचा खून केल्याचे सांगितलेआहे.

Baba Siddiqui murder case Arrest of accused financial helper Mumbai
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण: आरोपींना आर्थिक मदत करणाऱ्याला अटक
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Nishigandha Wad
हिंदी मालिकेच्या सेटवर निशिगंधा वाड यांचा अपघात; तातडीने रुग्णालयात केलं दाखल
Baba Siddique murder case
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण : आकाशदीप गिलला पंजाबमधून अटक
Kal ho naa ho
“तिथे उपस्थित असलेल्या…”, ‘त्या’ सिनेमातील शाहरुख खानच्या मृत्यूच्या सीनबद्दल अभिनेत्रीचा मोठा खुलासा
Baba Siddique Murder Investigation Latest Update
Baba Siddique Murder : बाबा सिद्दिकींचे मारेकरी गोळीबार करून पळाले नाहीत, लीलावती रुग्णालयात जाऊन…, पोलीस चौकशीत खुलासा
bihar man murder Mumbai
मुंबई: हातावर गोंदवलेल्या प्रेयसीच्या नावामुळे लागला हत्येचा छडा, प्रेमप्रकरणावरून बिहारमधील तरुणाची मुंबईत हत्या
deceased Raghunandan Jitendra Paswan
बिहारी तरुणाची मुंबईत हत्या; आंतरधर्मीय संबंधांतून हत्या झाल्याचा पोलिसांना संशय

अभिजीतने व्हिडिओमध्ये म्हंटले की, शिल्पाने जितेंद्र कुमार कडून १२ लाख उसने घेतले होते व ते घेऊन जबलपूरला पोबारा केला होता, जितेंद्रनेच मग शिल्पाचा खून करण्यासाठी अभिजीतला विश्वासात घेऊन सूचना दिल्या होत्या. यानंतरच्या एका तिसऱ्या पोस्टमध्ये अभिजीतने बाबू स्वर्गात भेटू असे म्हणत व्हिडीओ पोस्ट केला आहे.

Shraddha Murder Case : प्रेयसीचा मृतदेह फ्रिजमध्ये असताना आफताबचं नवं प्रेमप्रकरण? ती घरी यायची…

दरम्यान, अभिजीतने व्हिडिओमध्ये सांगितलेल्या जितेंद्र कुमारला अन्य एक सहकारी सुमित पटेल याच्यासह बिहारमधून अटक केली आहे. या संदर्भात पोलीस उपनिरीक्षक प्रियांका शुक्ला व शिवेश बघेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, ६ नोव्हेंबरला अभिजितने मेखला रिसॉर्टमध्ये रूम बुक केली होती. सीसीटीव्ही फुटेजच्या क्लिपनुसार दुसऱ्या दिवशी सकाळी शिल्पा नामक एक तरुणी या हॉटेलमध्ये आली होती, दुपारी जेवण ऑर्डर केल्यावर तासाभराने अभिजित या खोलीतून एकटाच बाहेर पडला होता. ८ नोव्हेंबरला हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी खोली उघडून पाहताच हा प्रकार उघडकीस आला.