आयुष्यात प्रत्येक जण कधी ना कधी प्रेमात पडतोच. कधी ते प्रेम शेवटपर्यंत टिकते, तर कधी ही प्रेमाची गोष्ट अर्ध्यावरच सोडावी लागते. यामागे अनेक कारणे असली तरीही या प्रेमातून बाहेर पडावेच लागते. अशावेळी आपल्याला ‘जब वी मेट’ मधली बॉयफ्रेंडचे फोटो फाडणारी किंवा ते फ्लश करणारी गीत आठवते. व्हॅलेंटाइन डे काही तासांवर आला असताना विविध हॉटेल्स आणि कॅफे यांच्याकडून भन्नाट ऑफर्स जाहीर करण्यात येत आहेत. तरुणांना आकर्षित करण्यासाठी या ऑफर्स जाहीर केल्या जात आहेत. अशीच एक भन्नाट ऑफर एका हॉटेलने जाहीर केली आहे.

तुमच्या एक्स बॉयफ्रेंड किंवा गर्लफ्रेंडचा फोटो दाखवायचा, तो फाडायचा आणि मोफत चिकन मिळवायचे अशी ही ऑफर आहे. मात्र यासाठी तुम्हाला १० चिकन विंग्ज खरेदी करावे लागणार आहेत. त्यावर तुम्हाला आणखी १० बोनलेस विंग्ज मोफत मिळणार आहेत. त्यामुळे जे लोक सिंगल आहेत त्यांनी चिंता करण्याची आवश्यकता नाही. ब्रेकअप झालेल्या या सिंगल लोकांसाठी या हॉटेलने पुढाकार घेतला आहे. अमेरिकेतील हूटर्स या नामांकित फूड चेनकडून ही ऑफर जाहीर करण्यात आली असून यामध्ये तुम्हाला आपल्या एक्सच्या फोटोची विल्हेवाट लावणे बंधनकारक आहे.

Story img Loader