Shreeman Legend Live Streamer: सोशल मीडियावर ‘श्रीमान लेजेंड’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या सिद्धांत प्रवीण जोशी याने अलीकडेच लोकसत्ताच्या इन्फ्ल्यूएंसरच्या जगात या सिरीजमध्ये हजेरी लावली. युट्युबवर तब्बल २० लाख चाहत्यांची श्रीमान फॅमिली व इंस्टाग्रामवर सुद्धा मिलियन पार फॉलोवर्स असणाऱ्या या सिद्धांत उर्फ श्रीमानचं तरुणाईला विशेष कौतुक आहे. अगदी मोकळ्या मनाने, काहीही फिल्टर न ठेवता व तरीही भान बाळगून बोलणाऱ्या श्रीमानवर लोकांचाही फार विश्वास आहे. याच श्रीमानविषयी काही न ऐकलेल्या जबरदस्त गोष्टी आज आपण या व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

श्रीमान हे नाव घेताच सगळ्यांना त्याच्या गेमिंग स्ट्रीम्स आठवतात, त्याने बहुसंख्य चाहते याच माध्यमातून मिळवले असल्याने ही त्याची निर्विवादपणे ओळख आहेच पण त्या आधी श्रीमानने मराठी मधील दोन प्रसिद्ध मालिकांसाठी संवाद लेखक म्हणूनही काम केलं आहे. या मालिका सोडण्याचं कारणही अभिमान वाटेल असं आहे. आपली आवड जपण्यासाठी माणसाने कशी हिंमत दाखवावी हे श्रीमानकडे बघून समजतं.

श्रीमानने मुलाखतीत श्रीमान चॅरिटी या अनोख्या संकल्पनेविषयी सुद्धा सांगितलं आहे. नैसर्गिक आपत्ती व संकटकाळी एक माणूस म्हणून आपण अन्य माणसांना मदत करायला हवी या भावनेने श्रीमानने हा उपक्रम सुरु केला आहे. खऱ्या अर्थाने १- १ रुपया गोळा करून त्यातून समुद्राएवढी विशाल मदत करण्यासाठी तो ओळखला जातो. या उपक्रमाविषयी सांगताना श्रीमानने युट्युबवरील अन्य कलाकार (स्ट्रीमर्स) ना सुद्धा एक मोलाचा सल्ला दिला आहे.

हे ही वाचा<< १३० अपयशी व्हिडीओ, महानगर गॅसमध्ये जॉब ते UIC; पॉवर कपल ‘प्रसिका’ची Exclusive लव्ह स्टोरी नक्की पाहा

श्रीमानसह गप्पा तुम्हाला कशा वाटल्या हे कमेंट करून नक्की कळवा आणि. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी लोकसत्ताच्या पेजवर व्हिडीओ सेक्शनला भेट द्यायला विसरू नका .