Sara Ali Khan & Shubman Gill Viral Video: शुबमन गिल व सारा अली खान यांच्या डेटिंगच्या चर्चा सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने पसरल्या होत्या. आधी शुबमनचं नाव तेंडुलकरची लेक सारासह जोडले जात असताना यात अचानक सारा अली खानची एंट्री झाली होती. काही दिवसांपूर्वी साराचा एक फोटो समोर आला होता. या फोटोमध्ये सारा भारतीय क्रिकेटर शुबमन गिलसोबत दिसत होती. हा फोटो समोर येताच सोशल मीडियावर दोघांच्या डेटींगच्या चर्चांना उधाण आलं होतं. आता तर शुबमन गिल आणि सारा अली खान हे एकाच हॉटेल मध्ये एकत्र दिसल्याच्या चर्चा सोशल मीडियावर सुरु आहेत.

एका व्हिडिओमध्ये, क्रिकेटर शुबमन गिल हॉटेलमधून बाहेर पडताना दिसत आहे तर सारा सुद्धा याच हॉटेलच्या लॉबीमधून बाहेर पडतेय. ते एकत्र या हॉटेलमध्ये होते का यावर दोघांनीही भाष्य केलेले नाही. काहीजण सुरुवातीला ही सारा नाहीच असेही म्हणत होते पण…

sonakshi sinha reaction on pregnancy rumours
सोनाक्षी सिन्हाने गरोदर असल्याच्या अफवांवर दिली प्रतिक्रिया; म्हणाली, “लोक वेडे…”
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
PM Narendra Modi special Note for Kareena Kapoor and saif ali khan sons
करीना कपूर-सैफ अली खानच्या मुलांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली ‘ही’ खास भेट, अभिनेत्रीने फोटो केला शेअर
Stree 2 Actor Mushtaq Khan Kidnapping
१२ तास डांबून ठेवलं अन्…; ‘स्त्री २’ फेम बॉलीवूड अभिनेत्याचं अपहरण! कशी झाली सुटका? सांगितला संपूर्ण घटनाक्रम
Salman Khan And Disha Patani Dance on Mujhse Shaadi Karogi song video viral
Video: मुझसे शादी करोगी…; सलमान खानचा दिशा पटानीबरोबर जबरदस्त डान्स, व्हिडीओ होतोय व्हायरल
shraddha kapoor andrew garfield
बॉलीवूडची ‘स्त्री’ अन् ‘स्पायडरमॅन’ जेव्हा एकत्र येतात, श्रद्धा कपूर आणि अँड्र्यू गारफिल्डचे फोटो पाहून चाहते म्हणाले…
kareena kapoor lal singh chadhha aamir khan
‘लाल सिंग चड्ढा’च्या अपयशाने निराश झाला होता आमिर खान, करीना कपूर खानने केला खुलासा; म्हणाली…
salman khan mother danching with helan
Video : सलमान खानच्या आईने हेलन यांच्याबरोबर धरला ठेका; उपस्थितही पाहतच राहिले, व्हिडीओ होतोय व्हायरल

सारा अली खान व शुबमन गिल एकाच हॉटेलमध्ये

दुसर्‍या व्हिडिओमध्ये, सारा विमानात बोर्डिंगच्या वेळी चाहत्यांसोबत सेल्फी घेताना दिसत आहे, यानंतर जेव्हा ती आपल्या सीटवर जाऊन बसते तेव्हा तिच्या शेजारचा प्रवासी शुबमन गिल असल्याचा अंदाज नेटकरी लावत आहेत. यापूर्वीही सारा व शुबमन मुंबईत डिनर डेटला गेल्याचे काही फोटो व्हायरल झाले होते.

दीपक चहर हनिमूनला गेला अन विश्वचषक.. पाठीच्या दुखण्यावर बहिणीने केलेली ‘ती’ पोस्ट होतेय Viral

सारा अली खान व शुबमन गिल विमानात

हे ही पाहा- मी सुंदर व टॅलेंटेड नसेन म्हणून सेटवर… जान्हवी कपूरने भावुक होत सांगितले शूटिंगचे अनुभव

दरम्यान, सारा अली खान ही यापूर्वी कार्तिक आर्यनला डेट करत असल्याच्या चर्चा होत्या. कॉफी विथ करणमध्ये तिने विजय देवरकोंडा आवडत असल्याचे सांगितले होते तर आता तिचे नाव शुबमन गिलसह जोडले जात आहे. दुसरीकडे शुबमन गिल सुद्धा तेंडुलकरच्या सारासह अनेकदा कॅमेऱ्यात स्पॉट झाला आहे. आता या दोघांमध्ये खरंच काही सुरु आहे का हे येत्या दिवसात समजेलच पण सध्या तरी ही संभाव्य जोडी नेटकऱ्यांना आवडत आहे. अनेकांनी या दोघांच्या व्हायरल व्हिडिओवर तुम्ही एकत्र छान दिसता अशा कमेंट केल्या आहेत.

Story img Loader