सोशल नेटवर्किंगवर कधी, काय आणि कोणत्या कारणासाठी व्हायरल होईल सांगता येत नाही. असंच काहीसं सध्या सुरु आहे श्वेता नावाच्या एका मुलीसंदर्भात. सोशल नेटवर्किंगवर श्वेता मिम्सने धुमाकूळ घातला आहे. इतकच काय तर ट्विटरवर Shweta हा शब्द टॉप ट्रेण्डींगमध्ये आहे. अनेकांना हा नक्की काय प्रकार आहे हे ठाऊक नाही तर हे प्रकरण ठाऊक असणारे मात्र मिम्सचा पाऊस पाडत आहेत. याच ट्रेण्डीगमध्ये असणारं श्वेता प्रकरण नक्की काय आहे आणि त्याबद्दल काय चर्चा सुरुय याबद्दल जाणून घेऊयात.

काय आहे प्रकरण

करोना लॉकडाउनमुळे व्हिडीओ कॉल किंवा ग्रुप व्हाइस कॉलची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलीय. अशाच कॉलमध्ये तांत्रिक माहिती नसल्याचे एखाद्याचा उडणारा गोंधळ आणि होणाऱ्या गंमती जमती सोशल नेटवर्किंगवर अनेकदा ट्रेण्ड होतात. श्वेता हे प्रकरण असंच आहे. एका ऑनलाइन क्लासदरम्यान ग्रुप कॉलवर असताना तो फोन म्यूट न करताच आपल्या मैत्रिणीला जवळच्या मित्राने सांगितलेल्या गोष्टी सांगणारी श्वेता नावाची मुलगी एका व्हायरल ऑडिओ क्लिपमुळे राष्ट्रीय स्तरावर चर्चेचा विषय ठरली आहे.

काय म्हणतेय या ऑडिओ क्लिपमध्ये श्वेता

व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमध्ये एका ग्रुप कॉलमध्ये सहभागी असणारी श्वेता नावाची मुलगी तिच्या दुसऱ्या एका मैत्रिणीसोबत बोलताना ऐकू येतं. मात्र ग्रुप कॉलवरील म्यूटचा पर्याय ऑन न केल्याने श्वेताने तिच्या मैत्रिणीला सांगितलेल्या अनेक खासगी गोष्टी ग्रुप कॉलवर ऐकू येत आहेत. श्वेता तिच्या पंडीत नावाच्या मित्राने सांगितलेल्या गोष्टी आपल्या जवळच्या मित्राला सांगत आहे. यामध्ये श्वेता पंडीत आणि त्याच्या प्रेयसीदरम्यानच्या खासगी गोष्टी मैत्रिणीला सांगताना ऐकू येतं. त्या मुलीला सेक्स करण्याचं व्यसन होतं. ते दोघे भेटल्यावर नेहमी सेक्स करायचे असं सारं काही श्वेता तिच्या मैत्रिणीला अगदी उत्सुकतेने सांगताना ऐकायला मिळत आहे. मात्र या दोघींमधील खासगी गप्पा ग्रुप कॉलवर ऐकू येत असल्याने कॉलवरील इतर सदस्य या श्वेताला कॉल म्यूट करण्यास सांगत आहेत. मात्र श्वेता आपल्याच तंद्रीत मैत्रिणीशी बोलताना ऐकू येत आहे. श्वेताने कॉल म्यूट न केल्याने तिने आपल्या मैत्रिणीला सांगितलेलं मित्राच्या खासगी आयुष्यातील सिक्रेट कॉलवर असणाऱ्या १११ जणांनी ऐकलं. हा ऑडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे.

आली मिम्सची लाट

श्वेता हा सध्या भारतामध्ये ट्विटरवरील टॉप ट्रेण्डींग टॉपिकपैकी एक आहे.

अनेकांनी यावरुन मजेदार मिम्सही शेअर केलेत. चला काही मोजके मिम्स पाहूयात

१) श्वेता पंडीतला म्हणाली असेल

२) १११ पोरांनी ऐकलं

३) कोणाला सांगू नकोस

४) अरे साऱ्या देशाने ऐकलं

५) अजिबात रिस्क नको

६) सगळ्यांना सांगायला हवं

७) या गप्पा ऐकताना

८) तुझ्यामुळे…

९) वर वर सांगायला…

१०) पुढे काय घडलं?

श्वेता प्रकरणावरुन अनेकांनी ग्रुप कॉलवर इतर गप्पा मारताना म्यूट केलं आहे की नाही हे तपासून घेण्याचा धडा सर्वांनी घ्यावा असंही म्हटलं आहे.