Viral Video | Sick Elderly Woman Crosses Flooded Stream In Cooking Pot: महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांमध्ये पावसाने कहर केला आहे. तसेच काही ठिकाणी रेड अलर्टदेखील जारी करण्यात आला आहे. शासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे आणि गरज असेल, तरच घराबाहेर पडा, असे आदेश काही ठिकाणी दिले आहेत.

अतिवृष्टीमुळे अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली असून, नदी, नाले ओसंडून वाहत आहेत. लोकांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत आंध्र प्रदेशातील एका गावातील आजारी वृद्ध महिलेला ॲल्युमिनियमच्या मोठ्या भांड्यात बसून ओढा पार करावा लागला. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून, त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Man wrote message for his wife in back of the car video goes viral
किती ते प्रेम! नवऱ्यानं बायकोसाठी कारच्या मागे लिहला खास मेसेज; रस्त्यावर सर्व बघतच राहिले, VIDEO पाहून कराल कौतुक
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
Bad sleep Routine can increase heart disease risk losing one hour of sleep takes four days to recover
झोपेचं रुटीन बिघडलंय! फक्त एक तासाची कमी झोप तुमच्या आरोग्यासाठी ठरेल धोक्याची घंटा? तज्ज्ञांनी केला खुलासा
jaipur kid not leaving kidnapper viral video
Video: चिमुकल्याला लागला अपहरणकर्त्याचा लळा, आई-वडिलांकडेही जाईना; पोलिसांनी सोडवताच रडू लागला!
your perfume turning your neck dark
तुमच्या परफ्युममुळे तुमची मान काळी पडतेय? वाचा तज्ज्ञ काय सांगतात..
security personnel slap scooter driver
VIDEO : दुचाकी विरुद्ध दिशेने चालवल्याने जवानाचा लाठीहल्ला; कारच्या डॅशकॅममध्ये घटना कैद
Crime News Varanasi
Crime News: ‘तू माझा नाही तर कुणाचाच नाही’, चिडलेल्या प्रेयसीचे धक्कादायक कृत्य; प्रियकराच्या पत्नीला…
Brother and sister fight on Raksha Bandhan
राखी बांधू देत नाही म्हणून भावाचे केस ओढले, बहीण भाऊ रक्षाबंधनाच्या दिवशीच भिडले, पाहा Viral Video

व्हायरल व्हिडीओ (Sick Elderly Woman Crosses Flooded Stream in Cooking Pot Viral Video)

आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम जिल्ह्यातील पेडा बायलू मंडलमधील जामीगुडा गावात ही घटना घडली. गावातील एक वृद्ध महिला आजारी पडल्याने तिला तातडीने रुग्णालयात दाखल करायचे होते. मात्र, संततधारेमुळे गावाचा जिल्ह्यापासून संपर्क तुटल्याने, तसेच गुंजीवाडा नाला ओसंडून वाहत असल्याने तिला प्रवास करता आला नाही.

हेही वाचा… Viral Video: रील करण्याच्या नादात उंच टेकडीवरून खाली कोसळली महिला; पुढे ‘जे’ झालं ते पाहून बसेल धक्का

व्हायरल झालेल्या व्हिडीओत ही महिला (Sick Elderly Woman Crosses Flooded Stream In Cooking Pot) ओढ्याच्या बाजूला थांबून दुसऱ्या बाजूला जाण्यासाठी थांबलेली दिसत आहे. एक माणूस ॲल्युमिनियमचे एक मोठे भांडे घेऊन येतो. त्या भांड्यात तो त्या महिलेला बसवतो आणि ते भांडे ओढ्यात सोडतो. त्या भांड्याला पकडून महिलेला तो माणूस ओढा पार करून देतोय

‘Krishnamurthy’ या एक्स अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. “आंध्र प्रदेशातील मन्यम येथील आदिवासी नेहमीच पूर्व-ऐतिहासिक युगात राहतात, तसेच आपल्या सोई-सुविधांपासून वंचित राहतात. रस्त्याअभावी (स्वातंत्र्याच्या ७७ वर्षांनंतर) आजारी आजीला दवाखान्यात जाण्यासाठी एकमेव रस्ता असलेला ओढा ओलांडण्यासाठी ॲल्युमिनियमच्या भांड्यात बसावे लागते आणि ओढा पार करावा लागतो. स्थान : जामीगुडा, पेडाबायलू मंडळ”, असं कॅप्शन या पोस्टला देत युजरने संताप व्यक्त केला आहे.

हेही वाचा… आता हेच बाकी होतं! दिल्ली मेट्रोत तरुणीने केली प्रग्नेन्सी टेस्ट, अश्लील Video Viral होताच नेटकरी संतापले; म्हणाले, “लाज…”

युजर्सचा संताप (Users Comments )

व्हायरल झालेल्या या व्हिडीओतील (Sick Elderly Woman Crosses Flooded Stream In Cooking Pot) वृद्ध महिलेचे हाल पाहून युजर्स संतापले आहेत. एका युजरने या व्हिडीओवर “सरकारची लाज वाटते”, अशी कमेंट केली आहे. तर, एकाने “उपायुक्त (DC) आणि सरकार काय करत आहे?”, अशी कमेंट करीत थेट प्रश्नच विचारला.” तर वृद्ध महिलेची मदत केल्याने एका नेटकऱ्याने “कुटुंबाचा हिरो” अशी कमेंट तरुणासाठी केली आहे.