Sidhu Moose Wala Mother : दिवंगत लोकप्रिय पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाची आई चरणकौर सिंग यांनी काही दिवसांपूर्वी मुलाला जन्म दिला. लोकप्रिय पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याची २०२२ मध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आली. सिद्धू हा त्याच्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. आयव्हीएफ तंत्रज्ञानाचा वापर करून पुन्हा एकदा सिद्धूच्या आई-वडिलांनी बाळाला जन्म दिला. सिद्धूच्या हत्येनंतर पहिल्यांदाच त्याच्या घरी आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे. दरम्यान सिद्धू मुसेवाला याच्या घरी झालेल्या जल्लोषाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये सिद्धू मूसवालाच्या घरी जल्लोषाचे वातावरण दिसत आहे आहे. अनेक महिला, पुरुष आणि तरुण जल्लोष करत नाचताना दिसत आहेत. त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. jot_.moosa नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. ज्याला आतापर्यंत ४० हजारांहून अधिक वेळा पाहण्यात आले आहे. तर सुमारे ४ हजार लोकांनी या व्हिडिओला लाईक केले आहे. यावर यूजर्स सिद्धूच्या कुटुंबाचे अभिनंदन करताना दिसत आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सिद्धू मूसेवाला याच्या कुटुंबाची चर्चा रंगली आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> कर्तव्य अन् जबाबदारी! पायलट वडिलांची लेकीबरोबरची पहिली फ्लाईट; VIDEO पाहून कराल कौतुक

सिद्धू मूसवालाचे वडील बलकौर सिंह यांनी आपल्या मुलाचा फोटो सोशल मीडियावर शेअर करताना लिहिले की, शुभदीपवर प्रेम करणाऱ्या लाखो फॅन्सच्या आशीर्वादाने, देवाने शुभदीपच्या धाकट्या भावाला पाठवले आहे.देवाच्या आशीर्वादाने कुटुंब निरोगी आहे आणि सर्व हितचिंतकांच्या प्रेमाबद्दल मी ऋणी आहे. गायकाचे वडील बलकौर यांनी सोशल मीडियावर शेअर केलेली पोस्ट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

सिद्धू मुसेवाला याच्या चाहत्यांची संख्या फक्त भारतात नाही तर, जगभरात आहे. आज देखील सिद्धू मुसेवाला याची गाणी ऐकणाऱ्यांची संख्या फार मोठी आहे. ज्यामुळे आजही गायकाची मोठी कमाई होते. युट्यूब आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून आजही सिद्धू मुसेवाला याची कमाई होते.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Siddhu moosewala house video goes viral after his brother birth trending srk