मोबाईल फोन ही आपल्या जीवनातील सर्वात मोठी गरज बनली आहे. आता कॉल करणे, सोशल मीडिया, मनोरंजन, रोजच्या घडमोडी सर्वाकाही आपण मोबाईल फोनवापरून करू शकतो. तिकीट बुक करणे, शॉपिंग करणे, फोटो काढणे अशा कित्येक सुविधा आपल्याला मोबाईलमध्ये मिळतात. आजच्या काळात क्वचितच एखादा व्यक्ती असा असेल जो मोबाईल फोनशिवाय राहू शकतो. जर तुम्हीही अशी व्यक्ती असाल जो आपल्या मोबाईल फोनपासून एक महिना दूर राहू शकता तर तुमच्यासाठी एक भन्नाट ऑफर आहे. जर तुम्ही हे आव्हान स्वीकारले तर तुम्ही जवळपास ८ लाख रुपये जिंकण्याची संधी मिळणार आहे.
Siggi’s Dairy, एक आइसलँडिक-शैलीतील योगर्ट कंपनी आहे ज्यांनी लोकांसाठी एक अनोखी स्पर्धा आयोजित केली आहे. स्पर्धकांना एक महिना मोबाईल फोन त्यांच्या आयुष्यातून काढून टाकावा लागेल. कंपनीने म्हटले आहे की, १० भाग्यवान विजेत्यांना १० हजार डॉलर्स म्हणजे सुमारे ८.३१ लाख रुपये बक्षीस म्हणून मिळतील.
‘SIGGI’ ने या स्पर्धेला ‘डिजिटल डिटॉक्स प्रोग्राम’ असे नाव दिले आहे. यामध्ये सहभागी होणाऱ्या लोकांना त्यांच्या स्मार्टफोन किंवा मोबाईल फोनपासून एक महिना दूर राहावे लागेल. जर ते हे करू शकले तर बक्षीस म्हणून १० हजार डॉलर्स जिंकण्याची संधी असेल.
या स्पर्धेच्या माध्यमातून लोकांना सामान्य जगाशी पुन्हा जोडण्याची संधी देतअसल्याचे कंपनीने म्हटले आहे. यात सहभागी होणाऱ्या कोणत्याही स्पर्धकाला त्याचा मोबाईल फोन बॉक्समध्ये जमा करावा लागेल आणि महिनाभर स्मार्टफोनशिवाय दिवस घालवावे लागतील.
तथापि, कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत स्पर्धकांकडे एक सिम कार्ड आणि मोबाईल फोन असेल. आणीबाणीच्या वेळीच त्याचा वापर करता येईल. कंपनीचे म्हणणे आहे की, ती लोकांना दारूचे व्यसन सोडण्यास सांगत नाही, तर स्मार्टफोनच्या व्यसनापासून दूर राहण्यास सांगत आहे. या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांना ३१ जानेवारीपर्यंत सहभागी होण्याची संधी आहे. SIGGI च्या वेबसाइटवर अर्ज केला जाऊ शकतो.
हेही वाचा – आंदोलन करणाऱ्या तरुणीला महिला पोलिस कर्मचार्यांनी केसांना पकडून नेले फरफटत, पाहा धक्कादायक Video
स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांना १०० ते ५०० शब्दांचा निबंध लिहिणे आवश्यक आहे ज्यात डिजिटल डिटॉक्सची आवश्यकता का आहे हे सांगावे लागेल.आणि “सिग्गीच्या ब्रँड तत्त्वज्ञानाशी संरेखित केलेल्या सकारात्मक मार्गाने तुमच्यावर कसा प्रभाव पडेल,”
सहभागी १८ किंवा त्याहून अधिक वयाचे असणे आवश्यक आहे. १५ फेब्रुवारी रोजी नो-स्मार्टफोन चॅलेंजमध्ये सहभागी होण्यासाठी १० संभाव्य विजेत्यांची निवड केली जाईल आणि त्यांना $10,000, एकस्मार्टफोनलॉक बॉक्स, फ्लिप फोन, फ्लिप फोनसाठी एक महिन्याचे प्रीपेड सिम कार्ड आणि तीन महिन्यांचे सिग्गीचे दही मिळेल.