काळे, घनदाट आणि लांबसडक केस असावे असे प्रत्येक स्त्रीचं स्वप्न असतं त्यामुळे प्रत्येक स्त्री आपल्या केसांची काळजी घेते. कित्येक महिलांचे लांब केस वाढवतात. लांब केस वाढवणे हे का स्त्रीयांपुरते मर्यादित नाही. आज काल अनेक पुरुषही लांब केस वाढवतात. पुरुषांमध्ये लांब केस ठेवण्याचा ट्रेंड आला आहे. सध्या अशाच एका मुलाची चर्चा होत आहे ज्यांना लांब केस वाढवण्याबाबतीत सर्व स्त्रियांना मागे टाकले आहे. उत्तर प्रदेशातील १५ वर्षीय सिदकदीप सिंग चहल ज्याने आज ‘सर्वात लांब केसांचा किशोरवयीन पुरुष’ म्हणून जागतिक विक्रम केला आहे. विशेष म्हणजे सिदकदीप याने आयुष्यात कधीच केस कापले नव्हते.
गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड (GWR) ने १४ सप्टेंबर रोजी एक्सवर चहलचा व्हिडिओ पोस्ट केला. या व्हिडिओमध्ये त्याने सांगितले की. “लोक म्हणतात माझे केस खूप लांब, खूप जाड आहेत व केसांची घनता चांगली आहे. (दाट केस आहेत) आणि त्यांनाही असे केस हवेत. माझे केस १३० सेमी किंवा फक्त चार फूट आणि तीन इंच इतके आहेत.”
त्यांच्या धार्मिक श्रद्धेमुळे, चहलच्या पालकांनी कधीही त्याचे केस कापले नाहीत आणि तोही आता त्याचे पालन करतो. याबाबत त्याने सांगितले की. “मी शीख धर्माचे पालन करतो आणि आम्हाला आमचे केस कापण्यास मनाई आहे.” शीख धर्माच्या मुख्य सिद्धांतांपैकी एक म्हणजे केस कापू नयेत, कारण ती देवाची देणगी आहे. शीख लोकांच्या प्रथेनुसार चहल सामान्यतः आपले केस एका अंबाड्यात बांधतो आणि दस्तार (पगडी) ने झाकतो.
सिदकदीपने सांगितले की, ”त्याचे केस एकटयाने धुण्यासाठी सुमारे २० मिनिटे लागतात आणि ते सुकण्यासाठी आणखी अर्धा तास लागतो. त्यानंतर, ब्रश करण्यासाठी १० ते १५ मिनिटे लागतात. मला यामध्ये माझ्या आईने मदत केली आहे कारण इतके लांब केस हाताळणे कठीण आहे. जर माझी आई नसती तर हा विक्रम माझ्याकडे असेल असे मला वाटत नाही,” चहल म्हणाला.
चहलचे केस लहानपणापासूनच लांब आहेत आणि जेव्हा तो तीन किंवा चार वर्षांचा होता तेव्हाच त्याचे खांद्यापर्यंत वाढले होते आणि जॉनी डेपसारखे दिसत होते. चहल सांगतो की, ”लहानपणी जेव्हा तो बाहेर केस सुकवायला जायचा तेव्हा त्याच्या मित्रांनी त्याला त्रास दिला होता, जे त्याला आवडतं नव्हते. त्याने हट्ट केला आणि आई-वडिलांना केस कापून देण्याची विनंती केली. पण, आता मला असे वाटते की माझे केस माझ्या असित्वाचा एक भाग आहे आणिमी ते जसे आहेत तसेच ठेवू इच्छितो.
हेही वाचा – घनदाट जंगलामध्ये ३००० फुट उंचीवर विराजमान आहे ‘ही’ गणपती मुर्ती; व्हायरल होतोय व्हिडीओ
चहल त्याचा वेळ अभ्यास, व्यायाम, वाचन आणि व्हिडीओ गेम खेळण्यात घालवतो. त्याने मजेत असेही सांगितले की “विश्वास ठेवा किंवा नका ठेवू पण माझे संपूर्ण व्यक्तिमत्व फक्त माझ्या केसांवर आधारित नाही,”
हा विक्रम मिळवल्याबद्दल तो आनंदी आहे आणि त्याने सांगितले की ”मी केसांसाठी जे काही करत होत त्या सर्व कामांना हा विक्रम मिळाल्यामुळे अर्थ प्राप्त होतो. जेव्हा मी लोकांना माझ्या रेकॉर्डबद्दल सांगितले, तेव्हा त्यांच्यापैकी बहुतेक जण माझ्यासाठी उत्साहित होते. ते माझ्यासाठी आनंदी होते. काही हसले. पण अखेर, विश्वविक्रम कोणाकडे आहे हे मह्त्त्वाचे,”
हेही वाचा- कुत्रा अन् कोल्ह्यासारखा दिसतो हा प्राणी! पहिल्यांदा आढळली विचित्र प्रजाती, नाव आहे Dogxim
गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड वेबसाइटनुसार, किशोरवयीन मुलांमध्ये सर्वात लांब केस जे २०० सेमी (६ फूट ६ इंच)इतके आहेत, जे भारतीय नागरिक असलेल्या निलांशी पटेल हिने वाढवले आहेत. तिने शेवटी २०२१ मध्ये तिचे केस कापले आणि ते एका संग्रहालयाला दान केले.
सध्या, जिवंत मनुष्यांमध्ये सर्वात लांब केसांचा विक्रम कोणाच्याही नावावर नाही; म्हणून चहल १८ वर्षांचा झाल्यावर हा किताब पटकावण्यास तयार आहे.