bhangra dance Video: सरत्या वर्षाला बायबाय करण्यासाठी ख्रिसमससाठी विशेष मेजवाण्यांचे आयोजन अनेक ठिकाणी करण्यात आले आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी यिअर एण्डिंग सेलिब्रेशन धुमधडाक्यात सुरु असतानाच दुसरीकडे कॅनडातील एका व्हिडीओनं नेटकऱ्यांची मनं जिंकली आहेत. उणे ३० अंश सेल्सियस तापमानात कॅनडातील शीख कलाकाराने भांगडा करून सर्वांना थक्क केलं आहे. कॅनडातील युकॉनमध्ये या शीख कलाकराने भर थंडीत भांगड्याचं नृत्यू सादर करून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या कलाकाराने सादर केलेला भांगडा कॅमेरात कैद झाला असून व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. ख्रिसमसच्या पार्श्वभूमीवर या व्हिडीओनं नेटकऱ्यांना एक जबदरस्त मेजवानीच दिली आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

भांगडा डान्सचा असा व्हिडीओ तुम्ही याआधी पाहिला नसले, कारण…

लोकांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण व्हावं, अशी अपेक्षा ठेऊन गुरुदीप पांढेर या शीख कलाकारानं उणे तापमानात भांगडा सादर करुन नवचैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. युकॉनमध्ये गुरुदीप भांगडा डान्स करण्यासाठी लोकप्रीय आहेत. भांगाड डान्सचे नृत्य गुरुदीप सोशल मीडियावर नेहमीच शेअर करत असतात. यावेळी तर त्यांनी कमालच केली आहे. जगातील थंड प्रदेश जिथे उणे ३० अंश सेल्सियस तापमान असतं, त्याठिकाणीच त्यांनी भांगडा करून तमाम प्रेक्षकवर्गाला आश्चर्याचा धक्का दिला आहे.

इथे पाहा व्हिडीओ

“युकॉनमधील निसर्गाच्या कुशीत असलेल्या उणे ३० अंश सेल्सियस तापमानात मी तुम्हाला ख्रिसमसच्या शुभेच्छा पाठवत आहे. आनंद, आशा आणि सकारात्मकता!”, असं गुरुदीप यांनी ट्विटरवर पोस्ट शेअर करत म्हटलं आहे. दरम्यान, गुरुदीप यांच्या भांगडा डान्सचा जबरदस्त व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी स्तुतीसुमनं उधळली आहेत. तसंच व्हिडीओला नेटकऱ्यांनी प्रतिक्रियांचा वर्षावही केला आहे. या व्हिडीओला तब्बल 203.1 k एव्हढे व्यूज मिळाले आहेत. तर ५ हजारांहून अधिक लाईक्सही मिळाले आहेत. या व्हिडीओला प्रतिक्रिया देत एक नेटकरी म्हणाला, ” तुमची सकारात्मकता, आंतरिक आनंद आणि धगधगती उर्जा पाहून नक्कीच प्रेरणा मिळेल. तर दुसरा नेटकरी म्हणाला, “तु्म्ही खूप छान आहात गुरुदीप आणि आनंदाचं वातावरण निर्माण करण्यात तुम्हाला कधीच अपयश येणार नाही.”