Sikkim Landslide Video: मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे सिक्कीममध्ये मोठ्या प्रमाणावर विध्वंस झाला आहे. भूस्खलनामुळे सिक्कीममधील रस्ते आणि पुलांचे नुकसान झाले आहे. अशातच भूस्खलनाच्या वेळचा एक थरारक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुमचाही थरकाप उडेल.
सिक्कीममध्ये निसर्गाचं रौद्र रूप
पूर्व सिक्कीममध्ये मंगळवारी सकाळी भूस्खलन झाले. त्यामुळे राज्यातील एक वीज केंद्र जवळपास पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. गेल्या काही आठवड्यांपासून येथे सातत्याने दरडी कोसळण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे ५१० मेगावॅट वीज केंद्राला लागून असलेली टेकडी धोक्यात आली होती. मंगळवारी सकाळी टेकडीचा मोठा भाग कोसळला आणि नॅशनल हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशनच्या तिस्ता स्टेज ५ धरणाचे पॉवर स्टेशन ढिगाऱ्याखाली गेले. पूर्व सिक्कीममधील सिंगताम येथील दिपू दराजवळील बलुतार येथे ही दुर्घटना घडली.
लोकांच्या किंकाळ्या अन् भूस्खलन
या दुर्घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, भूस्खलनात पॉवरहाऊसच्या दिशेने मोठे दगड आणि मोडतोड वेगाने घडत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे त्या परिसरात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नाही. व्हिडीओमध्ये मोठ्या खडकाचा एक भाग कोसळत असून, काही वेळाने त्याचा मोठा भाग वीज केंद्रावर पडत असल्याचे दिसत आहे. अशातच सिक्कीममध्ये मुसळधार पावसामुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्याअंतर्गत सिक्कीममधील अनेक भागांतील रस्ते बंद झाले आहेत. त्याचबरोबर अनेक ठिकाणी दरड कोसळण्याच्या दुर्घटनाही समोर आल्या आहेत.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> VIDEO: बापरे! बियरच्या कॅनमध्ये अडकलं सापाचं डोकं; ३ तास प्रयत्न केले अन् शेवटी काय घडलं तुम्हीच पाहा
व्हायरल होत असलेला व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरील @s_r_khandelwal या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओतील निसर्गाचे रौद्र रूप पाहून नेटकरीही अवाक् झाले आहेत.
वायनाडमध्ये लोकं झोपली होती तेवढ्यात निसर्गाचा प्रकोप झाला
काही दिवसांपूर्वी केरळमधील वायनाड येथेही मुसळधार पावसात अशा स्वरूपाचे भूस्खलन झाले होते. या भूस्खलनामुळे अनेक घरे, जीव ढिगार्याखाली गाडले गेले. अनेक लोकांचा मृत्यू झाला; तर काही लोक जखमी झाले आहेत. या दुर्घटनेने सगळीकडे हाहाकार माजला असताना आता सिक्कीममधूनही तशीच दुर्घटना समोर आली आहे.