सरकारतर्फे नागरिकांचे आर्थिक व्यवहार जास्तीत जास्त सुरक्षित व्हावेत, यासाठी कठोर नियम करण्यात येत आहेत. नुकतेच पॅनकार्ड आणि आधार कार्डही, तसेच बँक खाते आणि आधार कार्ड एकमेकांशी लिंक करण्यात आले होते. आता त्याचा पुढील टप्पा म्हणजे तुमचा मोबाईल क्रमांक आधार कार्डशी लिंक करण्यात येणार आहे. याबाबतची प्रक्रिया सुरु असून मोबाईल कंपन्यांकडून सिम कार्ड आधारला लिंक करुन घेण्याचे आवाहन कऱण्यात येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

यासाठी केंद्र सरकारकडून कालावधी निश्चित करण्यात आला आहे. या कालावधीत मोबाईल सिम कार्ड आधारशी लिंक न केल्यास तो बंद करण्यात येईल. याची मुदत फेब्रुवारी २०१८ पर्यंत असून, सर्वोच्च न्यायालयाने फेब्रुवारी २०१७ मध्ये पडताळणीसाठी आधार कार्डशी सिम लिंक करण्याचे आदेश सरकारला दिले होते. या नव्या नियमानुसार सर्व दूरसंचार कंपन्या आपल्या ग्राहकांची पडताळणी पुन्हा एकदा करणार आहेत. पोस्टपेड आणि प्रीपेड ग्राहकांचाही यामध्ये समावेश असेल. यासाठी कंपन्यांनी आपल्या ग्राहकांना कस्टमर केअरच्या माध्यमातून याबाबतची माहिती देण्यासही सुरुवात केली आहे.

दूरसंचार मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशातील अनेक नागरिकांना सिम कार्ड कागदपत्रांची पडताळणी न करता देण्यात आले होते. अनेकदा सिम कार्ड बनावट ओळखपत्रावर घेण्यात आल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. मात्र, मोबाईल क्रमांक बँक खात्याशी जोडल्याने गैरप्रकार होण्याचाही धोका आहे. त्यामुळे सर्व मोबाईल क्रमांकांची पडताळणी व्हावी, अशी याचिका सुप्रीम कोर्टात ‘लोकनिती फाऊंडेशन’ या स्वयंसेवी संस्थेकडून करण्यात आली होती. या याचिकेवरील सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने हा आदेश दिला होता. त्यानंतर आता सरकारकडून पडताळणी प्रक्रियेसाठी कालावधी निश्चित करण्यात आला असून त्यानुसार नागरिकांना आपले सिम कार्ड आधारशी लिंक करुन घ्यावे लागणार आहे.