भारतीय कर्णधार विराट कोहली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी सोशल मीडियावर सतत चर्चेत असतात. दोघेही सध्या सर्वोच्च स्थानी आहेत. या दोन दिग्गज व्यक्तींमध्ये समानता असल्याचे उद्योजक हर्ष गोएंका यांनी सांगितले आहे. हर्ष गोएंका यांनी ट्विट करत दोन्ही दिग्गजांमधील साम्य समोर आणलं आहे…

हर्ष गोएंका यांच्या मते दोघांमध्ये बऱ्याच बाबतीत साम्य आहे. दोघांची निर्णय क्षमता सारखीच आहे. दोघेही निडरपणे, न घाबरता बोल्ड निर्णय घेतात. दोघांनाही ऐतिहासिक विजय मिळवला आहे. दोघेही नैतिकता पाळून आपले काम अखंडपणे न थकता करतात. दोघांचा दृष्टीक्षेप एकच आहे. भारताला अग्रस्थानी पोहचवण्याचा दृष्टीक्षेप दोघांचाही आहे. दोघेही चतुर लिडर आणि सल्लागार आहेत.

दोघांनाही पराभव मान्य नाही. वितरणासाठी ते नेहमीच असमाधानकारक असतात. प्रत्येक गोष्ट नेहमी पुढे राहून करतात. त्यामुळे दोघांमध्येही नेतृत्व ठासून भरले आहे. दोघांनाही भारताला शीर्षस्थानी पोहोचवायचे आहे. त्यासाठी दोघेही दिवसरात्र प्रयत्न करत असतात. विराट कोहली क्रिकेटमध्ये तर मोदी विकास करण्यात भारताचे नाव जगात करत आहेत.

भारताने ऑस्ट्रेलियामध्ये एतिहासिक विजय मिळवला आहे. त्या धर्तीवर गोएंका यांनी ट्विट केले. गोएंका यांनी कोहलीची नेतृत्वाची स्तुती मोदींसी करून खेळाची एकप्रकारे पोचपावतीच दिली आहे. ऑस्ट्रेलियातील विजयानंतर भारत न्यूझीलंड दोऱ्यावर जाणार आहे. नरेंद्र मोदी आणि विराट कोहली यांच्यासाठी पुढील काही दिवस निर्णायक आहेत. मोदीसाठी लोकसभा निवडणुका महत्वाच्या आहेत. तर विराट कोहलीसाठी विश्वचषकात भारताला जेतेपद मिळवून द्यायचे आहे.

Story img Loader