पुणेकरांच्या नादाला कोणीही लागत नाही कारण पुणेकरांना प्रत्येक प्रश्नाचे उत्तर व्यवस्थित देता येते तेही आपल्या पुणेरी शैलीत. पुणेकर अनेकदा पुणेरी पाटी द्वारे टोमणे मारून स्वार्थी आणि बेशिस्त लोकांना सुधारण्याचा प्रयत्न करतात. कधी नियम उल्लंघन करणार्‍यांसाठी पाटी लावतात तर कधी स्वार्थी लोकांना सत्याचा आरसा दाखवतात. अशाच एका पुणेरी पाटीची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे.

या फोटोतील पाटीवर लिहिले आहे की,” साधी सरळ माणसे मूर्ख नसतात, ते समोरच्याला चांगलं समजत असतात” व्हायरल पुणेरी पाटीवर प्रत्येकाशी चांगुलपणाने वागणाऱ्या व्यक्तीच्यावतीने लिहिलेली आहे आणि अशा चांगल्या लोकांचा फायदा घेणार्‍या स्वार्थी लोकांना शा‍ब्दिक टोला लगावला आहे. कारण स्वार्थी लोक इतरांच्या चांगुलपणाला त्यांचा मूर्खपणा समजतात आणि स्वत:च्या स्वार्थासाठी त्यांचा वापर करतात पण चांगुलपणाने वागणारी व्यक्ती कधीच मूर्ख नसते ती समोरच्याला चांगलं समजते. कारण असे म्हटले जाते की “व्यक्ती स्वत: जसा असतो तसचं जग त्याला दिसते” म्हणून चांगल्या व्यक्तीला सर्वजण चांगले आहे असे वाटते आणि स्वार्थी व्यक्तीला प्रत्येक व्यक्ती स्वार्थीच वाटतो त्यामुळे असे लोक इतरांशी देखील काहीतरी स्वार्थ पूर्ण करण्यासाठी सबंध ठेवतात. चांगल्या व्यक्तीला स्वार्थी व्यक्ती आणि त्याचा स्वार्थी हेतू दोन्ही कळतो पण तरीही तो समोरच्याला समजून घेऊन त्याला पुन्हा एक संधी देतो. हा त्याचा चांगुलपणा असतो मूर्खपणा नाही. स्वार्थी लोक मात्र लोकांच्या चांगुलपणाचा फायदा घेत राहतात. अशा लोकांना सुधारण्यासाठी कधी कधी शब्दांचा वापर करावा लागतो तो पुणेकरांना व्यवस्थित करता येतो. ही पुणेरी पाटी अशा स्वार्थी लोकांना टोमणा मारणारी आहे जी वाचून अनेकांना त्यांच्या आयुष्यातील स्वार्थी किंवा चांगले लोकांची आठवण करून देत आहे.

PM Narendra Modi Speech
PM Narendra Modi : नरेंद्र मोदींचं वक्तव्य; “आपल्या देशातल्या एका पंतप्रधानांना मिस्टर क्लिन म्हटलं जायचं, तेच म्हणाले होते…”
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Young woman threatened suicide did scene in road accused man for making her private video viral
“का केलेस माझे खासगी व्हिडीओ व्हायरल?” तरुणीनं भर रस्त्यात घातला राडा; शेवटी आत्महत्येची धमकी दिली अन्.., पाहा धक्कादायक VIDEO
Manoj Jarange Statemet on Namdev Shashtri
Manoj Jarange : मनोज जरांगेंची नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावर जोरदार टीका, “जातीयवादाचा नवा अंक…”
What Pankaja Munde Said?
Pankaja Munde : पंकजा मुंडेंचं वक्तव्य; “राजकारण म्हणजे गढूळ पाण्यात कपडे धुण्यासारखं, काही लोक सुपारी…”
Mother left her children on road and ran away motherhood shocking video viral on social media
“त्यापेक्षा जन्मच नव्हता द्यायचा ना”, तिला पोटच्या मुलांचीही नाही आली दया, निष्ठूर आईचा धक्कादायक VIDEO व्हायरल
Vishwas Nangare Patil told amazing poem of Suresh Bhat
Video : “कधीही हरल्यासारखे वाटेल तेव्हा हे ऐका” विश्वास नांगरे पाटील यांनी सादर केली सुरेश भटांची ही अप्रतिम कविता
Image Of Rajeev Shukla
“काँग्रेस असो वा भाजपा, हा व्यक्ती…” कोल्ड प्लेच्या गायकाबरोबर राजीव शुक्लांचा फोटो व्हायरल, सोशल मीडियावर मीम्सचा पूर

हेही वाचा – “हे फक्त आजोबाच करू शकतात!” चक्क पुराच्या पाण्यात नातवंडाना बोटीत बसवून फिरवले, Viral Videoपाहून पोट धरून हसाल

हेही वाचा – किती ही क्रूरता! उंटाचे पाय दुमडून बसवले चक्क बाईकवर, Viral Video पाहून संतापले लोक

इंस्टाग्रामवर aapalviralpune नावाच्या पेजवर ही स्टोरी शेअर केली आहे. ही पाटी वाचून स्वार्थी लोकांना त्यांच्या आयुष्यातील चांगल्या माणसांच्या चांगुलपणाचा सन्मान करण्याची आणि चांगल्या माणसांना त्यांचा चांगुलपणा हा त्यांचा मुर्खपणा नाही याची आठवण करून देत आहे. तुम्हाला ही पाटी वाचून कोणाची आठवण आली?

Story img Loader