दिवाळीच्या पाच दिवसांत फाटाक्यांमुळे मोठे प्रदूषण झाले आहे. आधीच देशातील अनेक महत्त्वांच्या शहरांनी प्रदूषणाची पातळी केव्हाच ओलांडली आहे. दिल्ली, मुंबई, पुणे, चेन्नई यांसारख्या शहरांची नावे आता जगातील सर्वाधिक प्रदूषणाच्या यादीत आली आहे. त्यातूनच गेल्या पाच दिवसांमुळे दिल्लीतील प्रदूषणाने धोक्याची पातळी ओलांडली आहे. याचा आरोग्यावर देखील गंभीर परिणाम होत आहे. बाहेरचे प्रदूषण कमी होण्यासाठी बराच अवधी लागेल पण तोपर्यंत अशा वातावरणात काही खबरदारी घेतली तर आरोग्याच्या दृष्टीने ते अधिक फायदेशीर ठरेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

* बाहेर जाताना रेस्पीरेटरचा वापर करा. मास्क लावण्यापेक्षा रेस्पीरेटर अधिक फायदेशीर आहेत. दुचाकीने प्रवास करताना हे जास्त फायदेशीर ठरेल.
* बाहेर पडताना डस्क मास्कचाही वापर करू शकता. यामुळे धुलीकण नाकावाटे शरिरात जाणार नाही.
* शहरी भागांत त्यातूनही जिथे वाहनांची वर्दळ अधिक असते अशा ठिकाणी प्रत्येकाने शक्य असल्यास घरात एअर फिल्टर लावून घ्या.
* हवेबरोबर अगदी सूक्ष्म असे धुलिकण घरात येतात. हे नाका तोंडात जाऊन अॅलर्जी, घसा दुखणे, सर्दी यासारखे त्रास होतात. तेव्हा घर नेहमी स्वच्छ ठेवा. शक्य असल्यास ओल्या कपड्याने घरातले कोपरे पुसून काढा.
* कार्पेट, गाद्या यामध्ये मोठ्या प्रमाणात धूलीकण अडकून राहतात तेव्हा आठवड्यातून एकदा तरी ते स्वच्छ करा.
* घरात धुम्रपान करणे टाळा.
*घरात एअर फ्रेशनरचा कमीत कमी वापर करा.