फास्टफूड कंपनी मॅकडॉनल्ड्समध्ये जाण्यासाठी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेच उत्सुक असतात. फ्राइज, बर्गर, आईस्क्रीम आणि अनेक फास्टफूड खायला अनेक जण पसंती दर्शवतात. तर आज सोशल मीडियावर एका बर्गर प्रेमीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्यक्तीने १९७२ पासून बर्गर खाऊन गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसमध्ये स्वतःचे नाव कोरले आहे. चला तर या खास व्यक्ती बद्दल जाणून घेऊ या…
अमेरिकेतील विस्कॉन्सिन येथील डॉन गोर्स्के (Don Gorske) यांनी सर्वाधिक बिग मॅक बर्गर खाल्ल्याबद्दल त्याचे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसमध्ये त्यांची नोंद करण्यात आली आहे. गेल्या ५० वर्षांपासून हे वृद्ध किमान दिवसाला एक मॅकडोनाल्डच्या बिग मॅक बर्गर खाण्याचा आनंद घ्यायचे. २०१८ मध्ये यांनी ३० हजार तर २०२१ मध्ये ३२ हजार आणि जानेवारी २०२३ पर्यंत ३३ हजार चारशे बिग मॅक बर्गर खाण्याचा विक्रम नोंदवला होता.
व्हिडीओ नक्की बघा :
तसेच सर्वाधिक बिग मॅक बर्गर खाल्ल्याचा पहिला विक्रम १९९९ मध्ये नोंदवण्यात आला होता. तेव्हा त्यांनी १५ हजार ४९० बर्गर खाल्ले होते. त्यानंतर १९९९ पासून त्यांनी आतापर्यंत खाल्लेल्या प्रत्येक बिग मॅक बर्गरची पावती, मॅकडोनाल्डचे पार्सल बॉक्स सुद्धा त्यांनी स्वतःजवळ जपून ठेवले आहेत आणि व्हिडीओत त्याची खास झलक सुद्धा दाखवली आहे. एकदा तुम्हीसुद्धा हा अनोखा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड…
१९७२ मध्ये त्यांनी पहिला बिग मॅक बर्गर खाल्ला आणि तेव्हापासून ते बर्गरची संख्या मोजत आले आहेत. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड यांच्या माहितीनुसार त्यांना या व्यक्तीचा विक्रम ओळखायला २५ वर्षे लागली. सोशल मीडियावर हा व्हिडीओ गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड यांच्या @guinnessworldrecords या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.