गेल्या काही दिवसांपासून ‘मनिके मागे हिते’ या गाण्याने सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातलाय. अगदी लहान्यांपासून ते मोठ्यांपर्यंत, बॉलिवूड सेलिब्रिटींपासून ते सामान्यांपर्यंत सगळ्यांच्याच तोंडी हे गाणं दिसून येतंय. हे गाणं श्रीलंकेची प्रसिद्ध गायिका योहानी हिने गायलंय, जे भारतीयांच्या सुद्धा पसंतीस पडत आहे. या गाण्याचे बोल कुणाला समजले नसले तरी या गाण्याच्या संगीताने लोकांची मनं जिंकली आहेत. या गाण्याची क्रेझ इतकी वाढलीये की लागोपाठ वेगवेगळ्या भाषेतली वर्जन सोशल मीडियावर धडकलीय. त्यानंतर आता बंगाली गायक अनिक धर याने गायलेलं ‘ढाक’ वर्जन आता सोशल मीडियावर आगीसारखं पसरू लागलंय. या वर्जनमध्ये गायकाने पारंपारिक वाद्य ‘ढाक’च्या तालावर या गाण्याला सादर केलंय.

‘मनिके मागे हिते’ गाणं गाणाऱ्या क्युट आणि गोड आवाजाचा योहानीचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. या गाण्याची क्रेझ थांबण्याचं काही नाव घेत नाही. आता हेच गाणं प्रत्येक जण आपआपल्या शैलीने सादर करत चर्चेत येत आहेत. पश्चिम बंगालचा गायक अधिक धर याने सुद्धा आपल्या हटके स्टाइलमध्ये हे गाणं गात नेटकऱ्यांच्या भेटीला या गाण्याचं ‘ढाक’ वर्जन आणलंय. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेलं ‘मनिके मागे हिते’ गाण्याचं हे ढाक वर्जन लोकांना खूपच आवडलंय.

या व्हायरल व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, बंगाली गायक अधिर हा एका मंदिराच्या बाहेर ढाक वाद्य घेऊन उभा आहे. त्याच्या बाजुला एक पंडीत बसलेले दिसून येत असून त्यांच्या हातात मोबाईलवर या गाण्याची लिरीक्स अधिरला दाखवत आहेत. व्हिडीओच्या सुरूवातीला अधिर ढाक या वाद्याची ओळख करून देताना दिसून येतोय. त्यानंतर मोबाईलमध्ये ‘मनिके मागे हिते’ गाण्याची लिरीक्स पाहून ढाक वाद्य वाजवत हे गाणं गाताना दिसून येतोय. या गाण्यात गायक अधिरचा मद्यधुंद आवाज एवढा वाखाणला गेला की, आता त्याचा हा व्हिडीओ सर्वत्र गाजतोय. बंगाली गायक अधिर आपल्या वेगळ्या अंदाजात हे गाणं गाताना दिसत आहे. त्याने ‘मनिके मागे हिते’ असं गायलं की प्रत्येकजण त्याच्या जादुई आवाजाच्या प्रेमात पडतोय. त्यामुळेच आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने शेअर केला जात आहे. आम्ही जे वर्णन करून सांगतोय त्यापेक्षा प्रत्यक्ष त्याचा व्हिडीओ पाहूनच तुम्हाला याचा खरा आनंद घेता येईल. हा व्हिडीओ एकदा पाहाच…

हेन्रीने योहानीचे प्रसिद्ध गाणं बंगाली गायक अधिरने ज्या प्रकारे गायलं ते ऐकून सर्वांना ते भावलं. सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या कमेंट्सवरून हे गाणं लोकांना खूप आवडत असल्याचे स्पष्ट होतंय. त्यामुळेच या गाण्याच्या व्हिडीओमध्ये लोकांनी उत्स्फूर्तपणे आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. एका यूजरने या गाण्याचं कौतुक करताना लिहिले की, तुम्ही हे गाणं कोणाकडूनही कोणत्याही भाषेत ऐकलं तरी तुमचं मन नक्कीच प्रसन्न होईल. काही युजर्सनी तर कोलकत्ता वर्जन काढण्यात यावं अशी मागणी केलीय. तर काही युजर्सनी या गाण्याला ‘ढाक’ वाद्याचा तडका देत केलेल्या नव्या प्रयत्नाचं कौतुक केलंय.

बंगाल गायक अधिर याने स्वतः हा व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केलाय. त्यानंतर हा व्हिडीओ वाऱ्यासारखा पसरू लागलाय. ढाक हे पश्चिम बंगालमधलं एक पारंपारिक वाद्य आहे. पारंपारिक ड्रमर असलेलं हे वाद्य बंगालमध्ये सण-उत्सवांमध्ये वाजवली जातात. बंगालच्या दुर्गा पूजामध्ये तर ‘ढाक’ वाद्यावरील ताल हे मुख्य आकर्षण असतं. ढाकवरील ताल हे उत्सव, भक्ती आणि एकात्मतेला प्रेरणा देणारे असतात. सोशल मीडियावर ट्रेंड होत असलेल्या ‘मनिके मागे हिते’ या गाण्याला बंगालची सांस्कृतिक ओळख बनलेल्या ‘ढाक’ वाद्यावरील ताल देत गायलेल्या या गाण्याला मोठ्या प्रमाणात पसंती मिळतेय.

बंगाली गायक अधिर धर याने गायलेल्या ‘ढाक’ वर्जनच्या गाण्याचा व्हिडीओ आतापर्यंत १३ हजारांपेक्षा जास्त लोकांनी पाहिलाय. मनिके मागे हिथे भारतीय भाषेतलं नसलं तरी अवघ्या काही महिन्यात ते भारतात हिट झालं. सध्या याच गाण्याची तमीळ, मल्याळी, तेलुगू आणि हिंदी, मराठी अशा वेगवेगळ्या भाषेतील व्हर्जन्स सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.

Story img Loader