Pathan Movie Besharam Rang Song Video: शाहरुख खान व दीपिका पदुकोणचा पठाण चित्रपट पाहण्याची प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. पठाण सिनेमा २५ जानेवारी २०२३ ला प्रदर्शीत होणार आहे. पठाण सिनेमातील ‘बेशरम रंग’ गाण्यानं आधीच सोशल मीडियावर धुमाकूळ घातला असल्याने प्रेक्षकांना पठाण सिनेमाचे वेध लागले आहेत. ‘बेशरम रंग’ गाण्यात दीपिकाने बोल्ड अंदाजात केलेला डान्स पाहून संपूर्ण सिनेविश्वातील कलाकारांच्या भुवया उंचावल्या आहेत. या गाण्याचे रिक्रिएशन केलेले व्हिडीओही सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत. तसंच ‘झुमे जो पठाण’ हे गाणंही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. पण बेशरम गाण्यानं एक वेगळाच माहोल केलेला दिसतोय. कारण जपानमधील तरुणीने या गाण्यावर भन्नाट डान्स केला आहे. तिचा व्हायरल झालेला व्हिडीओ पाहून या गाण्याच्या गायिका खुद्द शिल्पा रावंही प्रभावित झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जपानच्या तरुणीनं बेशरम रंग गाण्यावर केलेल्या जबरदस्त डान्सचा व्हिडीओ mayojapan नावाच्या युजरने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ इंटरनेटवर प्रचंड गाजला आहे. व्हिडीओ शेअर केल्यापासून आतापर्यंत जवळपास 108 K व्यूज या व्हिडीओला मिळाले आहेत. जपानी तरुणीनं सुंदर डान्स करून प्रेक्षकांना टाळ्या वाजवायला भाग पाडलं आहे. हा व्हिडीओ शेअर करत या तरुणीनं कॅप्शनमध्ये म्हटलंय, “बेशरम रंग गाण्यावर दीपिका पादुकोणसारखा बोल्ड डान्स करण्याचा प्रयत्न केला. पण मी तिच्यासारखा डान्स करु शकली नाही. मी प्रयत्न नक्की केला.” तसेच या गाण्याच्या गायिका खुद्द शिल्पा राव यांनाही या तरुणीचा डान्स आवडला. “तुझा डान्स पाहायला आवडलं” अशी प्रतिक्रिया राव यांनी दिली.

नक्की वाचा – Video: ‘पापा की परी’ हवेत उडली अन् दणकण जमिनीवर पडली, खतरनाक बाईक स्टंटबाजी करताना मुलींची झाली फजिती

Shilpa rao comment

सायरा नावाच्या तरुणीचाही बेशरम रंग गाण्यावर लिप्सिंग करत भन्नाट ठुमके लगावल्याचा व्हिडीओही नुकताच व्हायरल झाला आहे. दीपिका पादुकोण बेशरम रंग गाण्यावर जबरदस्त डान्स करताना टीव्हीत दिसते. त्याचवेळी ती तरुणीही दीपिकाने केलेल्या स्टेप्स फॉलो करत डान्स करण्याचा मनमुराद आनंद लुटताना या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता. या तरुणीचा व्हिडीओत बोल्ड अंदाज पाहून नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या. या व्हिडीओवर प्रतिक्रिया देताना एक नेटकरी म्हणाला, “हे खूप महान आहे.” दुसरा नेटकरी म्हणाला, “या तरुणीसमोर दीपिका फेल”. तर काही नेटकऱ्यांनी या व्हिडीओला पसंती दर्शवली असून हर्ट आणि लव्हचे इमोजीही पाठवले.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Singer shilpa rao loves japanese woman dance on besharam rang song pathaan movie trending news shahrukh khan deepika padukone nss