जर तुम्ही बऱ्याच काळापासून इंटरनेट वापरत असाल, तर तुम्हाला अक्षय कुमारने कौतुक केलेल्या दिल्लीच्या ‘सिंगिंग कॉप’ बद्दल माहिती असेलच. ‘केसरी’ चित्रपटातील ‘तेरी मिट्टी’ गाणारे दिल्ली पोलीसमधील एका जवानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अभिनेता अक्षय कुमारनेही त्यांचं भरपूर कौतुक केलं होतं. या पोलीस कर्मचाऱ्याने आता त्याच्या इन्स्टाग्रामवर एक नवा व्हिडीओ शेअर करत रहस्य उलगडल्यानंतर पुन्हा एक खळबळ उडाली आहे.
दिल्ली पोलीस रजत राठौड यांनी अक्षय कुमारच्या ‘केसरी’ सिनेमातील ‘तेरी मिट्टी’ हे गाणं गायलं आणि त्यांच्या या गायनाचा व्हिडीओ पाहून संपूर्ण देशभरातील नागरिक भावूक झाले. त्यांनी गायलेल्या गाण्यांनी अक्षरशः बॉलिवूड सेलिब्रिटींना देखील वेड लावलं होतं. त्यानंतर आता त्यांनी आणखी नवा व्हिडीओ शेअर करत त्यांचा आतापर्यंतचा प्रवास मांडलाय. दिल्ली पोलीस रजत राठौड यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर ह्युमन्स ऑफ बॉम्बेने पोस्ट केलेला व्हिडीओ शेअर करत आपला प्रवास सांगितलाय. दिल्ली पोलीस रजत राठौड यांच्या आईना देखील गायनाची आवड असल्यामुळे तिच्या लहानशा गोष्टींमधून खूप शिकायला मिळालं, असं सांगत रजत राठौड यांनी त्यांच्यातील कलेमागचं रहस्य उलगडलं.
“तुम्ही नेहमीच सर्व जगातील सर्वोत्तम असू शकता…फक्त प्रयत्न करत रहा! ” अशी कॅप्शन देत त्यांनी हा नवा व्हिडीओ शेअर केलाय. रजत राठौड यांचे वडील पोलीस होते, असं देखील त्यांनी या व्हिडीओमधून सांगितलंय. आईला असलेली गायनाची आवड आणि वडिलांची पोलीस वर्दी या दोन्ही गोष्टीतून ते घडत गेले.
आणखी वाचा : VIDEO: दारूच्या नशेत प्रवाशानं विमानात घातला गोंधळ; व्हिडीओ व्हायरल!
View this post on Instagram
दिल्ली पोलिस रजत राठौड यांनी हा व्हिडीओ शेअर करून २४ तासही उलगडले नाहीत तर या व्हिडीओला आतापर्यंत ३७,००० लाईक्स मिळाले आहे. तसंच त्यांच्या या व्हिडीओवर नेटकरी कमेंट्स करत त्यांच्या कलेचं कौतुक करताना दिसून येत आहेत. अक्षय कुमारने या ‘सिंगिंग कॉप’ ची स्तुती करण्यासाठी शेअर केलेली पोस्ट त्यांनी शेअर केली आहे.