Viral video: सिंह हा जंगलाचा राजा आहे. त्याच्याशी तुलना करता येईल असा कोणताही प्राणी नाही. सिंहाला सर्वात धोकादायक शिकारी देखील म्हटलं जातं. जर त्याने एखाद्याची शिकार करण्याचा निर्णय घेतला तर तो क्वचितच मागे हटतो. त्याचे पंजे इतके मजबूत असतात की ते सर्वात मोठी शिकारही सहज पकडू शकतात. सहसा त्यांच्यावर कोणी हल्ला करण्याची हिंमत करत नाही. पण सोशल मीडियावर सध्या एक वेगळाच व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये सिंह म्हशीवर हल्ला करण्याचा प्रयत्न करतो, मात्र नंतर जे काही होतं, त्यावर विश्वास ठेवणे कठीण आहे.

असं म्हणतात जिथं भीती संपते तिथं आयुष्य सुरु होते, असंच काहीसं या व्हिडीओमधून समोर आलेल आहे. एरवी वाघ, सिंहाच्या तावडीतून निसटणं तसं अवघड पण एका म्हशीने चक्क सिंहाला टक्कर दिली आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता,जंगलात दोन म्हशींच्या मागे शिकारीसाठी सिंह लागला आहे. बराच वेळ पाठलाग केल्यानंतर एक म्हस उलटून सिंहालाच दम देताना दिसत आहे. एवढावेळ सिंहापासून बचावासाठी पळणारी म्हस अचानक उलटी फिरते आणि सिंहाला टक्कर देते. हा व्हिडीओ आता मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Shiva
Video: आशू आणि शिवाच्या आयुष्यात दिव्यामुळे नवीन विघ्न? प्रोमो पाहून नेटकऱ्यांनी केली विनंती, म्हणाले, “कृपया आता काही…”
d y chandrachud on sanjay raut
D. Y. Chandrachud : संजय राऊतांच्या टीकेवर माजी…
The unique friendship of a leopard and a deer
“अशी मैत्री कधी पाहिली नसेल…” बिबट्या आणि हरणाची अनोखी मैत्री; VIDEO पाहून व्हाल थक्क
cutest puppies following traffic rules
Viral Video : ही चाल तुरुतुरु…! रस्ता ओलांडणाऱ्या श्वानाच्या पिल्लांना पाहून नेटकरी पडले प्रेमात; म्हणाले, “फक्त अशी साथ…”
Leopard Mother Sacrifices Herself To Protect Her Cubs shocking video
VIDEO: “विषय काळजाचा होता” पिल्लांना वाचवण्यासाठी बिबट्या मादी सिंहाला भिडली; शेवटी आईचं प्रेम जिंकलं की सिंहाची ताकद?
chaturang article
‘भय’भूती : भयातून अभयाकडे
black leopard maharashtra
Video: महाराष्ट्रात वाढताहेत काळे बिबट…

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> कलिंगड खाण्यासाठी चिमुकलीची धडपड; बाबांच्या कुशीतून अचानक मारली उडी अन्…VIDEO व्हायरल

ही क्लिप पोस्ट होताच व्हायरल झाली. यूजर म्हणाला, लोक चुकीचं म्हणतात की म्हशीला बुद्धी नसते. व्हिडिओ पाहून तुम्हाला समजेल की तिने किती हुशारीने सिंहाला प्रत्युत्तर दिले. तुम्ही असे अनेक व्हिडिओ पाहिले असतील, ज्यामध्ये जंगलाचा राजा सिंह म्हशीपासून दूर पळताना दिसतो. खरं तर त्याला म्हशीच्या शिंगाची भीती वाटते. कारण म्हशीने आपले टोकदार शिंग पोटात टाकले तर सिंहही वाचणार नाही. म्हणूनच सिंह नेहमी कळपात असतात तेव्हाच ते म्हशींवर हल्ला करतात. यासाठी ते आधी म्हशीला पकडतात आणि दुसरा सिंह मागून हल्ला करतो. पण म्हशींचा कळप आला तर सिंहांची खैर नाही.