जगातील प्रत्येक मूल आपल्या आईच्या सर्वात जवळ असते. त्याला या जगात आणण्याआधीच आई त्याचे नऊ महिने आपल्या पोटात पालनपोषण करते. आई बाळाला सगळ्यांपेक्षा ९ महिने जास्त ओळखत असते. भाग्यवान असतात ते लोक ज्यांना आयुष्याच्या प्रत्येक चढ-उतारात आईची सावली मिळते. पण असेही काही लोक आहेत ज्यांच्या डोक्यावरून ही सावली हिरावून घेतली जाते. अनेक मुलांना आईशिवाय मोठे व्हायला लागतो. मग यानंतर वडिलांना एकट्याल सर्व जबाबदारी पार पाडत प्रसंगी आईचीही जबाबदारी पार पाडावी लागते. दरम्यान थायलंडमधील एका वडिलांची सोशल मीडियावर तुफान चर्चा सुरु आहे. यांनी आपल्या मुलीसाठी खरोखर एका आईची भूमीका बजावलीय. या वडिलांनी सगळ्यांसमोर एक आदर्श ठेवला आहे.
आई मनाचा ‘बाप’माणूस!
सोशल मीडियावर या वडिलांची खूप चर्चा होत आहे. या वडिलांना फादर ऑफ द ईयर किताब दिला तरी चुकीचे ठरणार नाही. हे वडिल आपल्या मुलीच्या शाळेतील कार्यक्रमात एका महिलेच्या वेशात गेले होते. मुलीच्या शाळेत मदर्स डे निमित्त सर्व मुलांच्या आईला आमंत्रित करण्यात आलं होतं, यावेळी मुलीला वाईट वाटू नये म्हणून तिच्या वडिलांनी सेलिब्रेशनसाठी महिलेचा गेटअप करण्याचा निर्णय घेतला. आईची कमतरता भासू नये म्हणून ते चक्क महिलेच्या वेषात तिची आई म्हणून कार्यक्रमात सहभागी झाले.
हे प्रकरण थायलंडमधील असून वडील प्रच्य दिबू यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंट फेसबुकवर या घटनेचे फोटो शेअर केले आहेत. यावेळी त्यांनी पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, आज मदर्स डे आहे आणि मी तुझ्यासाठी आई होऊ शकतो.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा – ‘गदर-2’ची स्टोरी सांगितली म्हणून तरुणाला घरात घुसून मारलं; युपीमधील VIDEO सोशल मीडियावर तुफान व्हायरल
एका महिलेच्या वेशात मुलीच्या शाळेत जाताना त्यांना जराही संकोच वाटला नाही तसेच कोण काय बोलेल, शाळेतील मुले आपली चेष्टा करतील याचाही त्यांनी विचार केला नाही. तसेच या कार्यक्रमा दरम्यान ते सगळ्यात पुढे आणि शेवटपर्यंत बसले होते.