Viral Video : बहीण भावाचे नाते हे अतुट नाते असते. या नात्यात एकमेकांविषयी काळजी, प्रेम, जिव्हाळा व आपुलकी दिसून येते. कधी बहीण भाऊ एकमेकांबरोबर भांडतात पण एकमेकांशिवाय क्षणभरही राहू शकत नाही. एकमेकांची सावलीप्रमाणे साथ देणारे बहीण भाऊ एकमेकांच्या सुख दु:खात आयुष्यभर साथ देतात. आपल्याबरोबर खेळणारी, हसणारी, भांडणारी बहीण जेव्हा सासरी जाते, तेव्हा सर्वात जास्त दु:ख एका भावालाच होतं पण सासरी गेल्यानंतर सुद्धा तिचं प्रेम कमी होत नाही. जेव्हा ती माहेरी येते तेव्हा भाऊ आनंदी असावा, हे तिची अपेक्षा असते.
काही दिवसांवर दिवाळी आहे. दर दिवाळीला बहीण भाऊबीजेला माहेरी येते आणि भावाला ओवाळते, त्याला हक्काने गिफ्ट मागते. सध्या एक असाच एका बहीण भावाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये बहिण भावाला गिफ्ट नाही तर रडत रडत एक वचन मागते. तिने मागितलेलं वचन ऐकून तुमच्याही डोळ्यांत पाणी येईल. सध्या हा तुफान व्हायरल होत आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल भाऊ बहीणीला गिफ्ट देत असतो पण तेव्हा बहीण रडत रडत भावाचा हात आपल्या हातात घेते आणि त्याला वचन मागते. ती म्हणते, “या गिफ्टची आशा नाही. मला वचन दे तू पहिला की तू दारू कधी पिणार नाही. मला वचन पाहिजे. इथून पुढे तु कधीही दारू पिणार नाही. गिफ्टची काहीही गरज नाही.” व्हिडीओत तुम्हाला दिसेल की भाऊ तिला वचन देतो की तो कधीही दारू पिणार नाही. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला अश्रु आवरणार नाही. काही लोकांना त्यांच्या बहीणीची तर काही लोकांना त्यांच्या भावाची आठवण येईल. या व्हिडीओवर लिहिलेय, “एका बहिणीची भावाकडून अपेक्षा”
हेही वाचा : मुंबईचा मरीन ड्राईव्ह लोकांसाठी इतका खास का आहे? लोक मरीन ड्राईव्हलाच का जातात? हा Video एकदा पाहाच
पाहा व्हायरल व्हिडीओ (Viral Video)
हेही वाचा : Pune Video : पुण्यातील १३५ वर्ष जुन्या वाड्यातील वडापाव खाल्ला का? एकदा VIDEO पाहाच
pravinsalokhe.09 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “बहिणीची भावाकडून अपेक्षा” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “बहीण दुसरी आई असते” तर एका युजरने लिहिलेय, “दादा दारू नको पिऊ दारू पिऊ. मी माझा भाऊ गमावला.” आणखी एका युजरने लिहिलेय, “व्हिडिओ बघून डोळ्यात पाणी आलं भावा” एक युजर लिहितो, ” स्वामी समर्थ. या बहिणीच्या सर्व मनासारखे व्हावे…” तर दुसरा युजर लिहितो, “शहाणा असशील तर दारू सोड. दारू म्हणजे जीवन नाही”