बहिण भावाचे नाते हे सुंदर नातं असते ज्यात कधी थोडी भांडणे असतात, थोडा रुसवा-फुगवा असतो आणि भरपूर प्रेम असते. बहीण भाऊ एकमेकांबरोबर कितीही भांडले तर जेव्हा ते एकमेकांपासून दूर राहू शकत नाही. बहि‍णीला नेहमी त्रास देणारा भाऊ जेव्हा ती सासरी जाते तेव्हा ढसढसा रडतो. सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. पण सध्या बहीण भावाचे नात्यातील प्रेम दर्शवणारा एक हटके पोस्ट चर्चेत आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एका किशोरवयीन मुलीने तिच्या भावाला कामासाठी दूसर्‍या शहरात जात असल्याने एक हृदयस्पर्शी पत्र लिहिले आहे. सोशल मीडियावर हा व्हायरल झाले आहे, ज्यामध्ये या भावंडांच्या प्रेमाचे दर्शन घडले आहे. एका तेलुगू तरुणाने अलीकडेच रेडिटवर एक हृदयस्पर्शी कहाणी शेअर केली आहे की त्याच्या नवीन नोकरीसाठी चेन्नईला गेल्यानंतर तो तिला विसरणार नाही याची खात्री करण्यासाठी धाकट्या बहिणीने काय केले हे सांगितले आहे. भावाने नेहमी संपर्कात रहावे यासाठी त्याच्या बहिणीने त्याच्याबरोबर एक करार केला आहे ज्यामध्ये १३ अपेक्षा दिल्या आहेत. एवढचं नाही तर तिच्या या करारकडे दुर्लक्ष होऊ नये म्हणून तिने तो त्याच्या फोन वॉलपेपर म्हणून देखील ठेवला आहे.

रेड्डीट पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की,” “माझ्या लहान बहिणीने माझ्यासाठी हा करार केला कारण मी नोकरीसाठी शहराबाहेर जात आहे. तिने हे फोटो माझ्यासाठी वॉलपेपर देखील ठेवला जेणेकरून मी ते विसरू नये.” यासह बहिणीने हाताने लिहिलेल्या करारचा फोटो देखील शेअर केला आहे. फोटोमध्ये बहिणीने १३ अपेक्षा मांडल्या आहेत.

सर्व प्रथम तिने एक मजेशीर मागणी केली ज्यानुसार, भावाला त्याच्या पगाराच्या ०.५% रक्कम तिच्या बँक खात्यात जमा करावी लागेल.

दुसरी अपेक्षा : भावाने दोन-दिवसातून एकदा रात्री किंवा सकाळी कॉल करायचा आहे

तिसरी अपेक्षा : जेव्हा मी(बहीण) कॉल करेल किंवा त्याच्याशी बोलले तेव्हा भावाने तिच्यावर चिडू नये.

चौथी अपेक्षा : चेन्नईवरून परत येताना माझ्यासाठी(बहिणीसाठी) काहीतरी गिफ्ट घेऊन यावे.

पाचवी अपेक्षा : भावाने सर्वात जास्त महत्त्व मला(बहिणीला) द्यावे, मांजरीना नाही.

सहावी अपेक्षा : माझी(बहिणीची) १०वी झाली की तिला चेन्नईला घेऊन जावे

सातवी अपेक्षा : माझ्या दहावीच्या मार्क बघून मला करिअरसाठी मार्गदर्शन करावे

आठवी अपेक्षा : रित्विक सिंगच्या कवितांचे पुस्तक किंवा कादंबरी घेऊन द्यावे.

नववी अपेक्षा : जेवण करायला विसरू नको

दहावी अपेक्षा : नियमित व्यायाम कर

अकरावी अपेक्षा : थोडे वजन कमी कर

बारावी अपेक्षा : इकडे तिकडे वेड्यासारखा भडकू नको.

तेरावी अपेक्षा : नियमितपणे चांगली झोप घे

तिच्या शेवटच्या काही अपेक्षा वाचून नेटकरी भावूक झाले कारण तिने तिच्या भावाला घरापासून दूर राहून स्वतःची काळजी घेण्याचे वचन मागितले आहे.

या पोस्टने रेडिटवर लवकरच लक्ष वेधले, अनेक वापरकर्त्यांनी बहिणीच्या प्रेम व्यक्त करण्याच्या गोंडस पद्धतीचे कौतुक केले.

एका वापरकर्त्याने विनोद केला: “नमस्कार, मी तुमच्या बहिणीने नियुक्त केलेला वकील आहे. तुम्ही हे सर्व नियम पाळले पाहिजेत, नाहीतर आम्ही तुमच्यावर खटला भरू. विनोद बाजूला ठेवून, आज मी पाहिलेली ही सर्वात गोंडस गोष्ट आहे.”

“मला माहित नाही की, हे सर्व मला का शिफारस करण्यात आले आहे असे वाटत आहे, पण हे खूप सुंदर आहे.”

“सर्व भावंडांमध्ये ओपी आणि त्याच्या बहिणीसारखे संबंध नसतात. माझ्या बहिणीमध्ये एकाच छताखाली राहूनही अनेक महिन्यांपासून माझ्याशी बोलले नाही,” तिसऱ्या वापरकर्त्याने लिहिले.

या पोस्टने अनेकांना मजा दिली, हे सिद्ध करून की भावंडांचे संबंध, कितीही खेळकर असले तरी, नेहमीच सर्वात खोल प्रेमातून येतात.

“सर्व भावंडांमध्ये असे नाते नसते. माझ्या भावंडाने एकाच छतावर राहूनही अनेक महिन्यांपासून माझ्याशी बोलला नाही,” तिसऱ्या वापरकर्त्याने लिहिले.

या पोस्टने अनेकांना आनंद दिला, हे सिद्ध करून की, भावंडांच्या नात्यात कितीही वाद, मज्जा मस्ती झाली तरी ते नेहमीच त्यात प्रेम असते.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sister makes 13 demand agreement with brother who is leaving home for work transfer point 5 percent of salary in my bank account snk