Funny video: सोशल मीडियावर लग्नाचे अनेक मजेदार व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातील काही फनी असतात, जे बघितल्या बघितल्या लोटपोट होऊन हसायला येतं. तर काही व्हिडीओ पाहून आश्चर्यही वाटतं. असे व्हिडीओ यूजर्सना आवडतातही आणि ते शेअर करून त्यावर कमेंट्सही करतात. लग्न समारंभीत नेहमीच गमती-जमती चालत राहतात. अनेक नवरी-नवरदेव गंमत करतात. तर काही पाहुणेही त्यांची मजा घेतात. खास करुन नवरदेवाच्या किंवा नवरीच्या कलवऱ्यांची तर लग्नात हमखास चर्चा असते. कधी नवरदेवाचे बूट चोरतात तर कधी नवरदेवासोबत गंमत करतात. असाच एक लग्नातला व्हिडीओ सध्या समोर आला आहे, हा व्हिडीओ पाहून तुम्ही म्हणाल अशी मेहुणी नको रे बाबा..
मेहुणी शेर तर भाओजी सव्वा शेर
लग्नसोहळा म्हटलं की, प्रत्येक नातेवाईकाचे तालरंग तिथं पाहायला मिळतात. रुसवे फुगवे म्हणू नका, किंवा कोणाची जुळणं म्हणू नका. लग्नसराईच्या दिवसांमध्ये घडणाऱ्या या सर्व गोष्टी आठवणींच्या रुपात जेव्हा समोर येतात तेव्हा अनेकदा आपल्याला आनंद देऊन जातात. असाच एका लग्नातला व्हिडीओ सध्या समोर आला आहे, ज्यामध्ये मेहुणी आपल्या भाओजींची फिरकी घेत होती. आता हा नवरदेव नवरीच्या सापळ्यात अडकतोय की काय? याकडे सर्वांच्या नजरा होत्या. अगदी नवऱ्याचं वऱ्हाड देखील डोळ्यांत तेल घालून हा खेळ पाहात होते. पण मेहुणी शेर तर भाओजी सव्वा शेर निघाला.
मेहुणी आपल्या भाओजींची फिरकी घेत होती. आता हा नवरदेव नवरीच्या सापळ्यात अडकतोय की काय? याकडे सर्वांच्या नजरा होत्या. अगदी नवऱ्याचं वऱ्हाड देखील डोळ्यांत तेल घालून हा खेळ पाहात होते. पण मेहुणी शेर तर भाओजी सव्वा शेर निघाला.या व्हायरल होत असणाऱ्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, मेहुणी लग्नात नवरदेवाची मस्करी करताना दिसत आहे. ही तरुणी नवरदेवाला गुलाबजाम खायला देत आहे, मात्र नवरदेवानं तोंड उघडताच ती चमचा मागे घेते. यावेळी नवरदेवही काही कमी नाही. नवरदेवानंही मेहुणीचा चांगलाच पचका केला. नवरदेवानं नीट लक्ष ठेऊन मेहुणीने चमचा पुढे करताच गुलाबजामवर ताव मारतो. यावेळी सर्वच उपस्थित हसायला लागतात आणि मेहुणीचा मात्र चेहराच पडतो. हा व्हिडीओ पाहू तुम्हीही पोट धरुन हसाल. तुम्हीही पाहा हा व्हिडीओ
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> “डॉक्टर मला नवीन हृदय मिळालं” निरोगी आयुष्याची किंमत काय असते हे ‘हा’ VIDEO बघून कळेल
हा व्हिडीओ सोशल मीडियावर @HasnaZaruriHai नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर केला आहे. हा व्हायरल होत असून या व्हिडीओला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. नेटकरीही या व्हिडीओवर गंमतीशीर प्रतिक्रिया देत आहेत.