Sita- Ram Mandir Chicken Shop Video: लाईटहाऊस जर्नालिज्मला एक व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणावर शेअर होत असल्याचे आढळले. चार वर्षांपूर्वी राहुल गांधी आणि प्रियंका वाड्रा यांनी वायनाडमध्ये मुस्लिमांच्या नावावर मंदिर नोंदणीकृत केल्याचा दावा पोस्टमध्ये केला जात आहे. तपासादरम्यान या दाव्यात पाकिस्तानचा थेट संबंध असल्याचे लक्षात आले आहे. नेमकं हे प्रकरण काय, हे पाहूया…

काय होत आहे व्हायरल?

X यूजर Swami Ramsarnacharya Pandey ने व्हायरल व्हिडिओ आपल्या प्रोफाइल वर शेअर केला.

Vishwa Hindu Parishad on temple and mosque row
“…म्हणून मशिदीच्या जागेवरील दावे वाढत आहेत”, विश्व हिंदू परिषदेच्या नेत्यानं सांगितलं कारण
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Eknath shinde and ajit pawar (1)
NDA च्या बैठकीला अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रतिनिधी गैरहजर; एकनाथ शिंदे म्हणाले, “स्वार्थ भावनेने…”
mohan bhagwat in disputed religious land
Mohan Bhagwat: मोहन भागवतांच्या भूमिकेशी ‘दी ऑर्गनायझर’ची फारकत; म्हणे, “वादग्रस्त धार्मिक स्थळांचं सत्य समोर आलंच पाहिजे!”
Chandrashekhar Bawankule On Uddhav Thackeray
Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल; म्हणाले, “२०१९ मध्ये मोठी गद्दारी…”
bandra Nirmal Nagar mhada
वांद्रे, निर्मलनगरमधील म्हाडा संक्रमण शिबिरार्थी रस्त्यावर, निर्मलनगरमध्येच घरे देण्याची मागणी
Muramba
Video: “जोपर्यंत तू रमा…”, रमासारखी दिसणारी माही व अक्षय समोरासमोर येणार का? ‘मुरांबा’ मालिकेत ट्विस्ट, पाहा प्रोमो
nitish kumar Rahul Gandhi fact check photo
बिहारमध्ये मोठा राजकीय भूकंप! मुख्यमंत्री नितीश कुमार, तेजस्वी यादव अन् राहुल गांधीच्या VIRAL PHOTO मुळे चर्चांना उधाण; वाचा खरं काय?

इतर वापरकर्ते देखील व्हिडीओसह हाच दावा शेअर करत आहेत.

तपास:

आम्ही InVid टूलमध्ये व्हिडीओ अपलोड करून आमचा तपास सुरू केला. त्यानंतर आम्ही व्हिडीओमधून मिळवलेल्या कीफ्रेमवर रिव्हर्स इमेज सर्च केले.आम्हाला इंस्टाग्रामवर एक रील सापडली. कॅप्शननुसार, व्हिडीओमध्ये दिसणारे मंदिर पाकिस्तानमधील सीता राम मंदिर आहे.

त्यानंतर आम्ही गूगल कीवर्ड सर्च केले आणि YouTube चॅनल MyNation वर चार महिन्यांपूर्वी अपलोड केलेला व्हिडीओ सापडला.

व्हिडीओचे शीर्षक इंग्रजीमध्ये होते: Conversion of Sita-Ram temple in Pakistan’s Ahmadpur Sial to chicken shop sparks outrage

डिसेंबर २०२३ मध्ये अपलोड केलेल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये असे म्हटले होते: सीता राम मंदिराचे चिकन शॉपमध्ये रूपांतर करणे हे केवळ संतापजनक कृत्य नाही तर धर्म स्वातंत्र्याच्या अधिकाराचे स्पष्ट उल्लंघन आणि उघड अवहेलना आहे. सांस्कृतिक विविधता पाकिस्तानच्या अस्मितेचा अविभाज्य भाग आहे.

आम्हाला या घटनेबद्दल बऱ्याच बातम्या सापडल्या.

https://neherald.com/world/pakistan-hindu-temple-in-ahmadpur-sial-desecrated-converted-into-chicken-shop#:~:text=A%20Hindu%20temple%20in%20Pakistan’s,the%20region%2C%20reported%20News%20Intervention.

रिपोर्ट मध्ये नमूद केले आहे: शतकापूर्वी बांधलेल्या सीता-राम मंदिराचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व खूप आहे. ते या प्रदेशातील हिंदूंसाठी प्रार्थनास्थळ होते, अशी बातमी न्यूज इंटरव्हेंशनने दिली.

https://newsable.asianetnews.com/world/viral-video-conversion-of-sita-ram-temple-in-pakistan-s-ahmadpur-sial-to-chicken-shop-sparks-outrage-snt-s5qvwn
Historic Sita-Ram Temple converted into a chicken shop: Pakistan
https://www.republicworld.com/world-news/watch-pakistan-video-sparks-outcry-as-historic-sita-ram-temple-converted-into-chicken-shop/?amp=1

निष्कर्ष: पाकिस्तानमधील ऐतिहासिक सीता राम मंदिराचे चिकन शॉपमध्ये रूपांतर केल्याचा चार महिने जुना व्हिडिओ वायनाडचा म्हणून मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात आहे. व्हायरल दावा खोटा आहे.

Story img Loader