Viral Video: शिकार करा किंवा शिकार व्हा हा जणू काही जंगलाचा नियम आहे. जंगलात जिवंत राहायचं असेल तर शिकार करता यायला पाहिजे किंवा स्वत:चं संरक्षण करता यायला पाहिजे. ही बाब लक्षात घेऊन अनेक प्राणी त्यांच्या पिल्लांना प्रशिक्षण देतात. तर याआधी सुद्धा सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले होते. तर आज एक असा व्हिडीओ व्हायरल होत आहे ; ज्यात एक सिंहीण तिच्या पिल्ल्यांबरोबर शर्यत लावताना दिसून आली आहे.

व्हायरल युट्युब व्हिडीओ एका जंगलातील आहे. जंगलातील रस्त्याकडेला काही गाड्या उभ्या आहेत व एक सिंहीण सुद्धा उभी आहे. व्हिडीओ जसा जसा पुढे जातो तसं एक एक करून सिंहीणीची सहा पिल्ले जंगलातून बाहेर येत आहेत. त्यानंतर सिंह आणि सिंहीण पिल्लांना प्रशिक्षण देण्यासाठी त्यांच्याबरोबर शर्यत लावताना दिसत आहेत. सिंहीण पुढे जाते आहेत आणि दबक्या पावलांनी सहा पिल्ल हळूहळू मागून येत आहेत. एकदा पाहाच ही अनोखी शर्यत…

The young woman hit under the donkey's ear
पाठलाग करणाऱ्या गाढवाबरोबर तरुणीनं केलं असं काही… VIDEO पाहून नेटकरीही झाले अवाक्
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
cutest puppies following traffic rules
Viral Video : ही चाल तुरुतुरु…! रस्ता ओलांडणाऱ्या श्वानाच्या पिल्लांना पाहून नेटकरी पडले प्रेमात; म्हणाले, “फक्त अशी साथ…”
Leopard Mother Sacrifices Herself To Protect Her Cubs shocking video
VIDEO: “विषय काळजाचा होता” पिल्लांना वाचवण्यासाठी बिबट्या मादी सिंहाला भिडली; शेवटी आईचं प्रेम जिंकलं की सिंहाची ताकद?
black leopard maharashtra
Video: महाराष्ट्रात वाढताहेत काळे बिबट…
Fight between dog and cock people surprise after result dog scared from this bird watch viral video
VIDEO: “म्हणून कुणालाच कमी समजू नका” एवढ्याशा कोंबड्यानं कुत्र्याची काय अवस्था केली पाहाच
bird was happy to see the little girl
चिमुकलीला पाहून पक्षी झाला खूश; एकमेकांची करू लागले नक्कल अन् … पाहा खेळकर पक्ष्याचा VIRAL VIDEO

हेही वाचा…सगळ्यात छोटी ट्रेन, बुलेट बनवते ‘ही’ टॅलेंटेड व्यक्ती; VIDEO तून लाईटवर चालणारं रेल्वेस्थानकही पाहा

व्हिडीओ नक्की बघा…

दक्षिण आफ्रिकेच्या क्रुगर नॅशनल पार्कमधील हा व्हिडीओ आहे. टेस्ट साईटिंग्जचे सीईओ आणि संस्थापक नादव त्यांच्या साथीदारांसह जंगलात गेले होते. व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, जंगलातील प्राण्यांपासून आपल्या पिल्लांचे संरक्षण व्हावे म्हणून की, काय सिंहीण व सिंह मोकळ्या रस्त्यावर पिल्लांकडून सराव करून घेताना दिसत आहेत. आई-बाबा पुढे आणि सहा पिल्ले हळूहळू मागून चालत येत त्यांचे अनुकरण करतानाही दिसत आहेत.

जवजवळ एक तास ही शर्यत म्हणा वा सराव सिंहीण आणि सहा पिल्लांचा सुरु होता. हे दृश्य पाहून टेस्ट साईटिंग्जचे सीईओ आणि संस्थापक नदाव म्हणाले की, ‘हे विलक्षण दृश्य प्रत्यक्ष पाहायला मिळालं यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजतो’.सोशल मीडियावर हा व्हिडीओ त्यांनी नंतर लेटेस्ट साइटिंग्जने युट्युब चॅनेल @Latestsightings वर ३ मे रोजी शेअर केला आहे ; ज्याने वन्यजीवनाचे आणखीन एक उदाहरण दाखवलं आहे.