Six Month Baby Fell In Drainage: मुंबईला मागील तीन दिवसात पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. अशातच बुधवारी, संपूर्ण महाराष्ट्राचं काळीज पिळवटून टाकेल अशी एक घटना कल्याणच्या पत्रीपूल परिसरात घडली. हैदराबादच्या राहणाऱ्या योगिता रुमाले भिवंडीला आपल्या आई-वडिलांकडे प्रसूतीसाठी आल्या होत्या. सहा महिन्यांच्या बाळाला मुंबईतील वाडिया रुग्णालयात उपचारासाठी न्यायला त्या मुसळधार पाऊस असुनही बुधवारी स्वतः व वडिल ज्ञानेश्वर पोगूल यांच्यासह घरून निघाल्या होत्या. परतीच्या वेळी अंबरनाथ लोकल पत्रीपुलाजवळ बराच वेळ उभी होती. लोकल कल्याण रेल्वे स्थानकात जाण्याची चिन्हे नव्हती. इतर प्रवाशांप्रमाणे रेल्वे रुळावरून कल्याण स्थानकाकडे पायी निघालेल्या लोकांबरोबर योगिता व तिचे वडील सुद्धा खाली उतरून चालू लागले. यावेळी आजोबांच्या हातातून बाळ निसटून शेजारच्या नाल्यात पडून वाहून गेले.
नाल्यात वाहून गेलेल्या बाळाच्या आजोबांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “आम्ही ट्रेनमधून उतरलो कारण… “
Mumbai Rains News: बाळाच्या आजोबांची पहिली प्रतिक्रिया सध्या समोर येत आहे. संपूर्ण महाराष्ट्राला पडलेला एक प्रश्न म्हणजे तुम्ही ट्रेनमधून खाली उतरलातच का? यावर सुद्धा त्यांनी भाष्य केलं आहे.
Written by लोकसत्ता ऑनलाइन
Updated:
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 22-07-2023 at 08:33 IST
TOPICSट्रेंडिंग न्यूजTrending Newsट्रेंडिंग व्हिडीओTrending VideoठाणेThaneमुंबई न्यूजMumbai Newsमुंबईतील पाऊसMumbai Rain
+ 1 More
मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Six month old baby swept away in drainage first reaction of grandfather man says why got down from mumbai local train update svs