Child vs King Cobra Video Viral : जंगलात फिरत असताना खतरनाक प्राण्यांचा सामना करावा लागतो. परंतु, काही माणसं जराही न डगमगता या प्राण्यांना पाहण्यासाठी जंगल सफारी करत असतात. वन्यप्राण्यांची भीती नसणाऱ्या या माणसांना मात्र, एक चिंता नेहमीच सतावत असते. कारण रानावनात फिरत असताना एखादा भलामोठा विषारी साप समोर आला, तर अनेकांच्या अंगावर शहारे उभे राहतात. परंतु, एका सहा वर्षांच्या लहान मुलाच्या व्हायरल व्हिडीओनं अनेकांचा थरकाप उडवला आहे. कारण या चिमुकल्यानं जगतील सर्वात विषारी सापाची शेपटी पडकली अन् पुढे जे काही घडलं ते पाहून तुमच्याही अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

किंग कोब्राचा हा थतरनाक व्हिडीओ एन एस सुभाष चंद्र नावाच्या यूजरने ट्वीटरवर शेअर केला आहे. एका लहान बालकाने किंग कोब्रा सापाची शेपटी पकडून त्याच्यासोबत जीवघेणा खेळ खेळण्याचा प्रयत्न केला असल्याचं या व्हिडीओत पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून नेटकरी भन्नाट प्रतिक्रियांचा वर्षाव करत आहेत. एका नेटकऱ्याने प्रतिक्रिया देत म्हटलं, हा सर्वात वेगवान साप आहे. एका सेकंदात पलटी मारून त्या मुलाला सापाने चावा घेतला असता. या सापापासून त्या मुलाला वाचवण्यासाठी तिथे कोण आहे?

इथे पाहा व्हिडीओ

दुसऱ्या एका नेटकऱ्याने म्हटलं, सर्वात मोठा मुर्खपणा..ज्या व्यक्तीने या मुलाला सापाजवळ पाठवलं, त्याला तुरुंगात पाठवा. तर एका अन्य यूजरने म्हटलं, हा कोणत्या प्रकारचा मजाक आहे, मुलाला साप पकडण्याचं प्रशिक्षण कोणी दिलं? सापाला पकडण्यासाठी तो लहान मुलगा किती सक्षम आहे? किंग कोब्रा सर्वात विषारी सापांपैकी एक आहे आणि त्यांची लांबीही खूप जास्त असते. एक वयस्क किंग कोब्रा १० ते १२ फूट लांब असतो आणि त्याचं वजन २० पाऊंड (९ किलोग्रॅम) इतकं असू शकतं. नॅशनल जिओग्राफिकनुसार, किंग कोब्रा उभं राहू शकतात. हे साप न्यूरोटॉक्सिनच्या एका बाईटमध्ये २० लोकांना मारू शकतात.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Six year old child handles most venomous snake king cobra viral video flooded with netizens shocking reactions nss
Show comments