आपले आईवडिल हेच आपले सर्वस्व असतात. त्यांची काळजी घेणे हे आपले काम असते. त्यातही त्यांना कोणत्या आजाराने ग्रासले तर मग आपण त्यांची विशेष काळजी घेतो. आता ही काळजी घेणे वगैरे ठीक आहे. पण ६ वर्षांची एक चिमुकली आपल्या अर्धांगवायू झालेल्या वडिलांना जीवापाड जपत आहे. चीनमध्ये तिच्या वडिलांचा अपघात झाल्यानंतर तिच्या आईने वडिलांना सोडून दिले. त्यानंतर ही मुलगी आणि तिचे वडिल दोघेच एकत्र राहू लागले. वडिल व्हीलचेअरवर असल्याने ते त्यांची स्वत:ची कामेही करु शकत नाहीत. त्यामुळे ही चिमुकली परिस्थिती समजून घेत घराची जबाबदारी सांभाळते. तिचे नाव जिया असून ती सकाळी ६ वाजता उठून आपल्या वडिलांना मसाज करते. त्यानंतर आपल्या प्रात:विधी उरकते. इतकेच नाही तर ही चिमुकली वडिलांचे सगळे करुन शाळेतही जाते. शाळेतून आल्यावरही त्यांना खायला भरविण्याचे, घरातल्या घरात फिरवण्याचे, कधी बाहेर घेऊन जाण्याचे काम ती अतिशय निघुतीने करते.
सहा वर्षांच्या मुलीचं जाणतेपण! अर्धांगवायू झालेल्या वडिलांची घेते काळजी
हृदय हेलावून टाकणारी घटना
Written by लोकसत्ता ऑनलाइन
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 04-10-2018 at 20:44 IST
मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Six year old girl looks after her paralysed father after her mother abandoned the family