एककीकडे नाहिद आफरिनच्या गाण्यावर कट्टरतावाद्यांकडून टिका होत आहे तर दुसरीकडे केरळमधल्या रिअॅलिटी शोमध्ये गाणे गाणा-या सुहाना सईद हिच्यावरही टोकाची टीका टिप्पणी केली जात आहे, पण या सगळ्यांकडे दुर्लक्ष करत हिंदू मुस्लिम ऐक्याचे चांगले उदाहरण एका सहा वर्षांच्या मुलीने ठेवले आहे. या इवल्याशा मुस्लिम मुलीने गीता पठण करून सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हिंदूंचे पवित्र ग्रंथ श्रीभगवत् गीतेचे पठण फक्त हिंदूनेंच करावे असे कुठे लिहिले आहे. गीता, कुराण, बायबल सगळेच धर्मग्रंथ एकच शिकवण तर देतात आणि हेच सहा वर्षांच्या फिरोदसने दाखवून दिले. ओडिशाच्या केंद्रपारा जिल्ह्यात पार पडलेल्या गीता पठणाच्या स्पर्धेत ती अव्वल आली आहे. ती शोभनिय शिक्षाश्रम शाळेत शिकते. गीता पठणाच्या स्पर्धेत ४६ मुलांनी सहभाग घेतला होता. फिरोदसने गीतेमधल्या सा-या श्र्लोकांचे अचूक पठण केले. १०० पैकी तिने ९७ गुण मिळवले होते. गीता पठणाच्यावेळी तिची आई देखील तिच्यासोबत होते. ‘जेव्हा एक मुस्लिम मुलगी गीता पठणाच्या कार्यक्रमात भाग घेणार आहे हे जेव्हा आम्हाला कळलं तेव्हा आम्हालाही तिचे आणि तिच्या आईचे खूप कौतुक वाटले’ अशीही प्रतिक्रिया आयोजकांनी द हिंदूला दिली. फिरोदसने गीता पठण करुन या सा-यांची  मने जिंकून घेतली आहे.