Skoda Kylaq suv price: स्कोडा Kylaq लाँच झाल्यापासून ती चर्चेचा विषय बनला आहे. नवीन सबकॉम्पॅक्ट एसयूव्ही ९.०७ लाख रुपयांमध्ये (ऑन-रोड, मुंबई) लाँच करण्यात आली होती, तर तिची संपूर्ण किंमत यादी अद्याप जाहीर केली नव्हती. आता स्कोडाने आपल्या subcompact Kylaq SUV ची संपूर्ण किंमत देशात लाँच केली आहे. तर, Skoda Kylaqच्या किंमतीवर वर एक नजर टाकूया.
स्कोडा Kylaq किंमत
स्कोडाने अलीकडेच आपल्या नवीन कॉम्पॅक्ट SUV Kylaq ची संपूर्ण किंमत देशात लाँच केली आहे. Skoda Kylaq ची किंमत ९.१९ लाख ते १६.८४ लाख रुपये (ऑन-रोड, मुंबई) आहे. क्लासिक, सिग्नेचर, सिग्नेचर प्लस व प्रेस्टीज या चार व्हेरिएंट्समध्ये हे मॉडेल लाँच झालं आहे. व्हेरिएंटनुसार किमतीचे तपशील खाली दिले आहेत. टेबलमधील सर्व किमती ऑन-रोड, मुंबईच्या आहेत.
व्हेरिएंट्स | 6-स्पीड मॅन्यूअल | 6-स्पीड |
क्लासिक | ९.१९ लाख रुपये | |
सिग्नेचर | ११.१८ लाख रुपये | १२.३९ लाख रुपये |
सिग्नेचर प्लस | १३.५२ लाख रुपये | १४.५० लाख रुपये |
प्रेस्टिज | १५.८३ लाख रुपये | १६.८४ लाख रुपये |
याव्यतिरिक्त स्कोडा ब्रॅण्डच्या नवीन मॉडेलसाठी कालपासून म्हणजेच २ डिसेंबरपासून बुकिंग सुरू झाली आहे आणि याची डिलिव्हरी २७ जानेवारी २०२५ पासून सुरू होणार आहे. तुम्हाला ही SUV पाहायची असेल आणि अनुभवायची असेल, तर ती जानेवारीमध्ये होणाऱ्या भारत मोबिलिटी १७ जानेवारी २०२५ रोजी मध्येही दाखवली जाईल; जिथे तुम्हाला या कारबद्दल अधिक माहिती मिळेल.
स्कोडा Kylaq ब्रॅण्डच्या MQB-A0-IN प्लॅटफॉर्मवर आधारित, महिंद्रा XUV 3XO, मारुती ब्रेझा, Tata Nexon, Hyundai Venue आणि त्याच्या सेग्मेंटमधील इतर एसयूव्हीबरोबर स्पर्धा करेल.
डिझाइननुसार, मॉडेलला स्लीक एलईडी डीआरएल आणि स्प्लिट हेडलाइटसह ब्रॅण्डची सिग्नेचर बटरफ्लाय ग्रिल मिळते. नवीन मॉडेल आंतरराष्ट्रीय स्तरावर विकल्या गेलेल्या Elroq SUV सारखेच याचे डिझाइन्स आहेत.
त्याशिवाय मॉडेलला त्याच्या पॅकेजमध्ये १०-इंच टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टीम, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, सिंगल पेन सनरूफ, ऑटोमॅटिक हेडलॅम्प्स, पॉवर व व्हेंटिलेटेड सीट्स यासारखे फीचर्स मिळतात.
सुरक्षा उपकरणांबद्दल बोलायचे झाल्यास, मॉडेलला त्याच्या पॅकेजमध्ये सहा-एअरबॅग्ज, EBD सह ABS, ट्रॅक्शन कंट्रोल, सेन्सर्ससह रिव्हर्स पार्किंग कॅमेरा आणि बरेच काही मिळते.
पॉवर ट्रेनबद्दल बोलायचे झाले तर, Skoda Kylaq मध्ये 1.0-litre TSi पेट्रोल इंजिन आहे, जे 114bhp पॉवर आणि 178Nm टॉर्क जनरेट करते. हे इंजिन 6-स्पीड मॅन्युअल आणि 6-स्पीड ऑटोमॅटिक गिअर बॉक्सने सुसज्ज आहे.