एका ४२ वर्षीय स्कायडाइवरने आकाशातून विना पॅराशूट उडी मारून नवा इतिहास रचला आहे. हा इतिहास रचणा-या अवलियाचे ल्यूक एकिन्स असे नाव आहे. ल्यूकने शनिवारी २५ हजार फुटांवरून आकाशातून उडी मारण्याचा पराक्रम केला. त्याने हा पराक्रम फॉक्स वाहिनीच्या एका कार्यक्रमाकरिता केला होता. या अवलियाकरिता स्काय डाइविंग करणे हे काही नवीन काम नाही. त्याने यापूर्वी २० हजारपेक्षाही जास्त वेळा आकाशातून उडी मारली आहे. पण त्यावेळी त्याच्यासोबत पॅराशूट असायचे. यावेळी पहिल्यांदाच त्याने उडी मारताना पॅराशूटचा वापर केला नव्हता.
ल्यूकने विना पॅराशूट २५ हजारांहून उडी मारतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत त्याच्यासोबत आणखी तिघेजण प्लेनमधून उडी मारताना दिसतात. जवळपास १५० किमीच्या गतीने हे लोक जमिनीकडे येत होते. हे दृश्य पाहून भल्याभल्यांना घाम फुटतो. जसजसे हे स्काय डाइव्हर्स पृथ्वीच्या दिशेने आले, तसं काही वेळानंतरच यातील तिघांनी आपले पॅराशूट खोलले. मात्र, केवळ ल्यूकने आपले पॅराशूट न खोलता जमिनीच्या दिशेने आला. शेवटी ल्यूक त्यांच्यासाठी तयार करण्यात आलेल्या जाळीत पडताना दिसतो. हे करत असताना ल्यूककडून जर दिशाभूल झाली असती तर मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता होती. यात त्याचा जीवही जाऊ शकत होता. पण असे काही झाले नाही. ल्यूकने त्याचा स्टंट यशस्वीरित्या पूर्ण केला.
२ वर्षांपासून करत होता तयारी:
दोन वर्षांपासून आपण याकरिता तयारी करत असल्याचे ल्यूकने सांगितले. तो म्हणाला की, उडी मारण्यापूर्वी मी खूप घाबरलो होतो. त्याच्या म्हणण्यानुसार ल्यूकच्या आईने हा कार्यक्रम बघण्यासही नकार दिला होता. ल्यूक हा आधीपासूनच खूप प्रसिद्ध आहे. त्याने आयर्न मॅन ३ चित्रपटातही त्याने स्टंट केले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Skydiver luke aikins becomes first person to jump and land without parachute