आपण प्रसिद्ध व्हावं, सर्वांनी आपल्याला ओळखावं असं कुणाला वाटतं नाही. सध्या सेलिब्रिटींप्रमाणे फेमस होण्यासाठी सर्वसामान्यांसाठी सहजसोपं माध्यम ते म्हणजे सोशल मीडिया. सोशल मीडियावर काहीतरी हटके करत केलेल्या वेगवेगळ्या स्टंटचे व्हिडीओ तुम्ही भरपूर पाहिले असतील. पण सध्या एक व्हिडीओ जो व्हायरल होतोय तो पाहून साऱ्यांनीच तोंडात बोटं घातली आहेत. आकाशात अगदी पक्ष्यांसारखं उडण्याचा अनुभव घेण्यासाठी लोक स्कायडायव्हिंग करतात. पण तुम्ही कधी वर उंच आकाशात डान्स केलेला पाहिलाय का? मग हा व्हायरल व्हिडीओ एकदा पाहाच.
खुल्या आकाशात पक्ष्यांप्रमाणे उडता येईल, असे अनेकांचं स्वप्न असतं. स्कायडायव्हिंग लोकांना हे स्वप्न पूर्ण करण्यास मदत करते. त्यामुळे स्कायडायव्हिंग हा साहसप्रेमींसाठी आवडता अनुभव आहे. स्कायडायव्हिंगद्वारे, आपण आकाशात पक्ष्यांप्रमाणे उडू शकतो आणि आपल्या डोळ्यांनी खाली जग पाहू शकतो. इंटरनेटवर स्कायडायव्हिंगचे अनेक व्हिडीओ उपलब्ध आहेत. पण आकाशात डान्स केल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.
खरं तर, इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये काही स्कायडायव्हर्स जमिनीपासून कित्येक मीटर उंचीवर हवेत डान्स करताना दिसत आहे. हा थरारक व्हिडीओ यूजर्सना खूप आवडला आहे.
इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर मारिस लिवाने तिच्या mairis_l या अकाउंटवर गेल्या महिन्यात शेअर केला होता. मारिस हा स्कायडायव्हिंग प्रशिक्षक आहे. मारिसचा हा व्हिडीओ लाखो लोकांनी पाहिला असून आतापर्यंत २२ हजारांहून अधिक लाईक्सही मिळाले आहेत.