Shocking video: आईच्या प्रेमाची जगात कुठेही बरोबरी होऊ शकत नाही. आपल्या प्रत्येक संकटात आई अगदी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता धावून येते. माय असे उन्हातील सावली माय असे पावसातील छत्री, माय असे थंडीतील शाल यावीत आता दु:खे खुशाल. अगदी या चारोळीतील शब्दांप्रमाणेच आईची माया असते. स्वत:ला विसरून मुलांना घडविणारी, त्यांच्यावर संस्कार करणारी असते ती आई. मूल आणि कोणतेही संकट यांच्यामध्ये आई उभी असते, असे म्हणतात. मुलांचे आयुष्य मार्गी लागावे म्हणून ती अहोरात्र झटत असते. मात्र विचार करा हीच मुलं तिच्या जिवावर उठली तर? हो अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ज्यामध्ये एका मुलीनं आपल्या जन्मदात्या आईची काय अवस्था केली आहे ती पाहा. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आई आणि मुलीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना पाहून आपल्या आईसोबत असं कोण वागू शकतं असा सवाल आता प्रत्येक जण करत आहे. ही घटना हरियाणामध्ये घडली असल्याचं बोललं जात आहे.

या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, ती तरुणी तिच्या आईला बेदम मारहाण करत आहे, तर आई रडत रडत तिच्या मुलीला विनवणी करत होती की मारू नको. पुढे ही तरुणी चक्क आईच्या पायाचा चावा घेते. तसेच व्हिडिओमध्ये ती आईला शिवीगाळ करतानाही दिसत आहे. या घटनेचे चित्रीकरण कोणी केले हे स्पष्ट झालेले नाही. मात्र, पीडितेच्या मदतीसाठी कोणीही पुढे आले नाही. या तरुणीवर आपल्याच आईला मारहाण केल्याप्ररणी पोलिसांनी कारवाई करण्याची मागणी नेटकऱ्यांकडून होत आहे.

पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @ShoneeKapoor नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. एकानं म्हंटलंय की, यासारखी प्रकरणे रोज वाढत आहेत . जिथे आई वडिलांचा स्वतःच्या घरात छळ केला जात आहे,” तर आणखी एकानं, तिची स्वतःची आई आहे, सासू नाही हे नशीब नाहीतर काय केलं असते” तर तिसऱ्या यूजरने कमेंट केली, आपला समाज कुठे चालला आहे? काय दिवस आले त्या माउलीवर “देवा अशी मुलगी कुणालाच नको देऊ”‘